ETV Bharat / bharat

संरक्षण मंत्रालयाचा यूटर्न...चिनी घुसखोरी संबंधीचा अहवाल वेबसाईटवरून हटवला - संरक्षण मंत्रालय अहवाल

पूर्व लडाखमधील प्योंगयांग त्सो, हॉट स्प्रिंग आणि गोग्रा भागात 17 आणि 18 मे ला चिनी सैन्याने अतिक्रमण केल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या कागदपत्रांत मान्य केले होते. मात्र, माध्यमांमध्ये या संबंधी वृत येताच संरक्षण मंत्रालायने घाईगडबडीने ही माहिती काढून टाकली आहे.

संरक्षण मंत्री
संरक्षण मंत्री
author img

By

Published : Aug 6, 2020, 3:10 PM IST

नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील विविध भागात चिनी सैन्याने अतिक्रम केल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने मान्य केले होते. या संबंधीचा अहवाल मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर अपलोड केला होते. मात्र, माध्यमांमध्ये या संबंधी वृत येताच संरक्षण मंत्रालायने घाईगडबडीने ही माहिती काढून टाकली आहे.

पूर्व लडाखमधील प्योंगयांग त्सो, हॉट स्प्रिंग आणि गोग्रा भागात 17 आणि 18 मे ला चिनी सैन्याने अतिक्रमण केल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या कागदपत्रांत मान्य केले होते. मात्र, चिनी सैन्याने भारतीय भूमीत अतिक्रमण केले नसल्याचा दावा सरकारचा आहे. चिनी सैन्य भारतात आले नसून कोणतीही चौकी त्यांच्या ताब्यात नाही, असे जाहीरपणे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. मात्र, सरकारच्या भूमिकेशी विसंगत माहिती संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केल्याने सरकारची गोची झाली. त्यामुळे गोंधळलेल्या संरक्षण मंत्रालयाने हा अहवाल काढून टाकला.

चीनी सैन्याने मे महिन्यात पूर्व लडाखच्या काही भागामध्ये घुसखोरी केल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने मान्य केले होते. ५ मे पासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि गलवान व्हॅलीच्या प्रदेशात चीनच्या हालचाली वाढल्या होत्या. १७ व १८ मेला कुगरांग नाला, गोग्रा आणि उत्तर पँगाँग लेकच्या प्रदेशात चीनी सैन्याने घुसखोरी केल्याचेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते.

संरक्षण मंत्रालयाने प्रथमच चीनच्या घुसखोरी उघडपणे मान्य केली होती. या कागदपत्रांनुसार ६ जूनला दोन्ही बाजूच्या सैन्यातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चर्चा झाली. मात्र, त्यानंतर १५ जूनला दोन्ही सैन्यांमध्ये चकमक झाली व त्यामध्ये जीवितहानी झाली. सध्या दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेली चर्चा लांबण्याची शक्यता आहे, असे म्हटले होते.

आतापर्यंत भारत-चीन दरम्यान सैन्याच्या पाच उच्चस्तरीय बैठकी झाल्या आहेत मात्र, त्यातून विशेष असे काही निष्पन्न झाले नाही. दोन्ही बाजूचे अधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर रणगाड्यांसह ४५ हजार सैन्य आणून ठेवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.