ETV Bharat / bharat

स्वातंत्र्य दिन : खबरदारी म्हणून काश्मीरमध्ये बंद केली मोबाईल इंटरनेट सुविधा - mobile internet services

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरमध्ये आज मोबाईल इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली आहे.

मोबाईल इंटरनेट
मोबाईल इंटरनेट
author img

By

Published : Aug 15, 2020, 5:24 PM IST

श्रीनगर - स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरमध्ये आज मोबाईल इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली आहे. इंटरनेट सुविधा वगळता फोन सेवा सुरू आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घाटी भागात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून आज पहाटे पासून मोबाईल इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली आहे.

दरम्यान सुरक्षेच्या कारणावरून 2005 पासून काही अपवाद वगळता दरवर्षी इंटरनेट सुविधा खंडित करण्यात येते.

आज कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन अतिशय साध्या पद्धतीने पार पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 ऑगस्ट रोजी सातव्यांदा लाल किल्यावरून देशवासियांना संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व प्रथम सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मेरे प्यारे देशवासियो म्हणत मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. स्वातंत्र्य दिनाच्या या भाषणात त्यांनी भविष्यातील संकल्प देशवासीयांपुढे मांडले. यामध्ये त्यांनी आत्मनिर्भर भारत, कोरोना संकट, कृषी क्षेत्र, नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन आदी विषयांवर भाष्य केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.