हुबळी- हुबळी रेल्वे स्थानकावर स्फोट झाला आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून रेल्वे पोलीस आणि स्थानीय पोलिसांकडून घटनास्थळाची तपासणी केली जात आहे. ज्या बॉक्सचा स्फोट झाला त्या बॉक्सवरती 'कोल्हापूर' व 'आमदार' असे लिहिले असून 'नो भाजप नो काँग्रेस ओनली शिवसेना' असा राजकीय संदेश बॉक्सवरती लिहिला आहे.
रेल्वे स्थानकावर हुसैन साहेब नाईकवाडे हा व्यक्ती बॉक्स घेऊन उभा होता. त्याने बॉक्स उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉक्समध्ये स्फोट झाला. यात हुसैन साहेब नाईकवाडे गंभीर जखमी झाला आहे. हुसैनच्या हाती असलेला बॉक्स हा महाराष्ट्रातील आमदार प्रकाश यांच्या नावाने होता. दरम्यान, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांकडून घटनास्थळाची तपासणी केली जात आहे.