नवी दिल्ली - सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. १४ एप्रिलला संपणारा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी यांनी ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय काल (मंगळवारी) जाहीर केला. यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी नागरिकांना सप्तपदीचे पालन करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या सप्तपदीबाबत आयुष मंत्रालयाने माहितीपत्रक आणि नियमावली जारी केली आहे. गरम पाणी पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते यासारख्या अनेक बाबी आयुष मंत्रालयाने सांगितल्या आहेत.
-
The global pandemic is moving ahead with great strength and steadfastness. But we will continue as one team, we will continue to fight it.
— Ministry of AYUSH🇮🇳 #StayHome #StaySafe (@moayush) April 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Prime Minister @narendramodi today announced the extension of #COVID-19 lockdown till 03 May 2020. pic.twitter.com/Z9d3ofv5Ol
">The global pandemic is moving ahead with great strength and steadfastness. But we will continue as one team, we will continue to fight it.
— Ministry of AYUSH🇮🇳 #StayHome #StaySafe (@moayush) April 14, 2020
Prime Minister @narendramodi today announced the extension of #COVID-19 lockdown till 03 May 2020. pic.twitter.com/Z9d3ofv5OlThe global pandemic is moving ahead with great strength and steadfastness. But we will continue as one team, we will continue to fight it.
— Ministry of AYUSH🇮🇳 #StayHome #StaySafe (@moayush) April 14, 2020
Prime Minister @narendramodi today announced the extension of #COVID-19 lockdown till 03 May 2020. pic.twitter.com/Z9d3ofv5Ol
आयुष मंत्रालयाने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवर एक व्हिडिओ टि्वट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांनी सांगितलेल्या सप्तपदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
- घरातील वृद्धांची काळजी घ्या
- लॉकडाऊनचं पालन करा
- आयुष्य मंत्रालयाच्या सुचनांचे पालन करा
- आरोग्य सेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करा
- गरीब परिवारांसाठी भोजनाची सोय करा
- नोकरीवरून कोणालाही काढू नका
- अत्यावश्यक सेवेतील लोकांचा आदर करा
गरम पाणी प्या, योग प्राणायम करा, ध्यानसाधना करा, हळद आणि अद्रकाचा आहारात समावेश करा आदी बाबी आयुष मंत्रालयाने जनहितार्थ जारी केल्या आहेत. यासंदर्भात सविस्तर माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या.
http://ayush.gov.in/event/ayurveda-immunity-boosting-measures-self-care-during-covid-19-crisis