श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कराने दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यावेळी अतिरेकी आणि लष्करामध्ये चकमक झाली. यानंतर दहशतवाद्यांनी बंदुका आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जागेवरच टाकून त्या ठिकाणाहून पोबारा केला.
शुक्रवारी रात्री पोलीस आणि लष्कराने मिळून हे सर्च ऑपरेशन सुरू केले होते. कुलगाममध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कुपवाडाच्या नंदीमार्ग भागामध्ये पोलीस आणि लष्कर मिळून अतिरेक्यांचा शोध घेत होते. यावेळी एका ठिकाणी पोहोचल्यानंतर, एका घरामधून लष्करावर गोळीबार करण्यात आला. तेव्हा हे अतिरेकी याच घरात आहेत, अशी जवानांची खात्री पटली.
-
One PIKA LMG and material for making improvised explosive device (IED) has been found from house of one Aslam. Now tracker dog is being used for tracking down the escaped militants: Jammu & Kashmir Police (2/2) https://t.co/f5HMuRQ5YM
— ANI (@ANI) April 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">One PIKA LMG and material for making improvised explosive device (IED) has been found from house of one Aslam. Now tracker dog is being used for tracking down the escaped militants: Jammu & Kashmir Police (2/2) https://t.co/f5HMuRQ5YM
— ANI (@ANI) April 11, 2020One PIKA LMG and material for making improvised explosive device (IED) has been found from house of one Aslam. Now tracker dog is being used for tracking down the escaped militants: Jammu & Kashmir Police (2/2) https://t.co/f5HMuRQ5YM
— ANI (@ANI) April 11, 2020
त्यानंतर जवानांनीही प्रत्युत्तर करत त्या घरात शिरकाव केला. तेव्हा या दहशतवाद्यांनी मागच्या दाराने पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्या घरातून बॉम्ब बनवण्याचे साहित्य, आणि पीआयकेए एलएमजी अशी बंदूक जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आता श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.
हेही वाचा : 'प्लाझ्मा थेरपी' सुरू करण्यास केरळ तयार; रक्तदानाचे नियम शिथील करण्याची प्रतीक्षा..