ETV Bharat / bharat

आज...आत्ता... रविवार ०९ जून २०१९ रात्री १२ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या

दिंडोरीच्या ओझे कालव्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षापदी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे नाव आघाडीवर आहे. एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन औवेसी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना लंडनच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सरदार वल्लभभाई पटेलांप्रमाणे मोदी तुम्हीही पोलादी पुरूष व्हा असे उद्धव ठाकरे म्हणाले. विश्वचषकात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ३6 धावांनी पराभव केला.

आज...आत्ता... रविवार ०९ जून २०१९ रात्री १२ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या
author img

By

Published : Jun 9, 2019, 11:43 PM IST

दिंडोरीच्या ओझे कालवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा बुडून मृत्यू
नाशिक - दिंडोरी येथील ओझे कालवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा तिच्या मुलांसह पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना घडली सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सविस्तर वाचा....

भाजप प्रदेशाध्यक्षपदी ठाकूर, कुटे आणि हाळवणकर यांच्या नावाची चर्चा
मुंबई - खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत जानेवारी 2019 मध्ये संपली आहे. तसेच दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही संधी मिळाल्याने भाजप नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात असून उपाध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, सुरेश हाळवणकर आणि संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रदेश कोर कमिटीची बैठक बोलावली असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीसह प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवरही चर्चा होत आहे. सविस्तर वाचा...

एमआयएमचे आमदार ओवैसींची प्रकृती बिघडली; लंडनच्या रुग्णालयात भर्ती
हैदराबाद - एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती खालावली आहे. ही गोष्ट त्यांच्या घरच्यांना आजच समजली आहे. अकबरुद्दीन यांच्यावर लंडनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. यासाठी ते लंडनला उपचार घेण्यासाठी गेले आहेत. सविस्तर वाचा...

वल्लभभाई पटेलांप्रमाणे मोदीजी तुम्ही पोलादी पुरुष व्हा - उद्धव ठाकरे
जालना - रजाकारीमध्ये कणखर होऊन सरदार वल्लभभाई पटेल यांनी रझाकाराला हुसकावून लावले, त्यांच्या या कणखर बाण्यामुळे त्यांना पोलादी पुरुष म्हणत होते. तसेच मोदीजी तुम्हीही पोलादी पुरुष व्हा आणि मराठवाड्यातील या दुष्काळी जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज घारे मानेगाव (तालुका जालना) येथे केले. सविस्तर वाचा....

WC : भारताकडून ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत.. टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
लंडन - विश्वकरंडकात लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळण्यात येत असलेल्या या सामन्यात भारताने थम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचे 'विराट' आव्हान ठेवले आहे. भारताकडून शिखर धवनचे ११७ धावा करत दमदार शतक झळकावले. तर रोहित शर्मा (५७) आणि कर्णधार विराट कोहलीने (८२) धावा करत संघाची धावसंख्या तिनशेपार नेली. सविस्तर वाचा...

sample description
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.