ETV Bharat / bharat

'लॉकडाऊन'मध्येही सुरू राहणार शेतीच्या यंत्रसामग्रीची, ट्रक दुरुस्तीची दुकाने - ट्रक दुरुस्ती दुकाने

शेतीची यंत्रसामग्री, त्याचे सुटे भाग विकणारी दुकाने तसेच, गरजेच्या वस्तूंची ने-आण करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या ट्रकांसाठी सर्व ट्रक दुरूस्ती करणारी दुकानेदेखील लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक म्हणून सुरू राहतील, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

MHA directs states to ensure smooth harvesting and sowing operations during lockdown
'लॉकडाऊन'मध्येही सुरू राहणार शेतीच्या यंत्रसामग्रीची, ट्रक दुरुस्तीची दुकाने..
author img

By

Published : Apr 5, 2020, 6:25 PM IST

नवी दिल्ली - लॉकडाऊनदरम्यानही देशातील शेतीची, पेरणीची कामे सुरळीतपणे चालू रहावीत यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली. यासोबतच कृषी क्षेत्राशी निगडीत मूलभूत आस्थापने चालू राहतील याकडे लक्ष देण्याचे आदेशही मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतीची कामेही ठप्प झालेली दिसून येत आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालायने राज्यांना याबाबत निर्देश दिले आहेत. आपापल्या राज्यांमध्ये शेती आणि पेरणीविषयक कामांसाठी लागणाऱ्या गरजेच्या सेवा सुरू राहतील याबाबत राज्य सरकारांनी खबरदारी घ्यायची आहे, असे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.

यामध्ये शेतीची यंत्रसामग्री, त्याचे सुटे भाग विकणारी दुकाने तसेच, गरजेच्या वस्तूंची ने-आण करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या ट्रकांसाठी सर्व ट्रक दुरूस्ती करणारी दुकानेदेखील लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक म्हणून सुरू राहतील, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : ई-वे बिलाची मुदत एप्रिल अखेरपर्यंत वाढवली; सरकारच्या निर्णयाचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.