ETV Bharat / bharat

१७ इतर प्रवर्गातील जातींचा एससी प्रवर्गात समावेश घटनाबाह्य - मायावती

author img

By

Published : Jul 1, 2019, 1:05 PM IST

उत्तरप्रदेश सरकारने १७ जातींचा घटनाबाह्य पद्धतीने इतर प्रवर्गातून एससी प्रवर्गात समावेश केला आहे. एससी प्रवर्गात इतर जातींचा समावेश करुन घेणे हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे.

बसप प्रमुख मायावती

लखनौ - उत्तरप्रदेश सरकारने १७ इतर प्रवर्गातील जातींचा एससी प्रवर्गात समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. १७ जातींचा एससी प्रवर्गात समावेश हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय असून हे घटनाबाह्य आहे, अशी टीका मायावतींनी केली आहे.

मायावती म्हणाल्या, संविधानातील कलम ३४१ नुसार, राज्य सरकार एससी प्रवर्गात कोणत्याही जातीचा समावेश करु शकत नाही किंवा कोणत्याही जातीला एससी प्रवर्गातून काढू शकत नाही. परंतु, उत्तरप्रदेश सरकारने १७ जातींचा घटनाबाह्य पद्धतीने इतर प्रवर्गातून एससी प्रवर्गात समावेश केला आहे. फक्त राष्ट्रपती आणि संसदेलाच आरक्षणात फेरफार करण्याचा अधिकार आहे. या जातींना एससी प्रवर्गात सामिल केले असले तरीही याचा कोणताही फायदा त्यांना होणार नाही. योगी सरकारने या जातींची फसवणूक केली आहे.

एससी प्रवर्गात इतर जातींचा समावेश करुन घेणे हा फक्त राजकीय हेतून घेतलेला निर्णय आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन स्वत:च्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मी राज्य सरकारला हा निर्णय मागे घेण्यासाठी अपील करते. या निर्यणावर केंद्र सरकारने कायद्यानुसार १७ जातींना एससी प्रवर्गात सामिल करताना आरक्षणाचे प्रमाण वाढवताना त्यांना प्रमाणानुसार आरक्षण द्यावे, अशी मागणी करते, असेही मायावती निर्णयावर टीका करताना म्हणाल्या.

उत्तरप्रदेश सरकारने शुक्रवारी १७ जातींचा एससी प्रवर्गात समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये कश्यप, मल्लाह, कुम्हार, राजभर, प्रजापती आणि इतर जातींचा समावेश होता. राज्य सरकारने या निर्णयाबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवताना या जातींना एससी प्रवर्गाचे प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.