नवी दिल्ली - येथील मरकजप्रकरणी तपास करत असलेल्या गुन्हे शाखने मौलाना सादच्या तीन मुलांसह कुटुंबातील अन्य १७ जणांची चौकशी केली आहे. मात्र, आत्तापर्यंत मौलाना साद गुन्हे शाखेच्या चौकशी प्रक्रियेत सहभागी झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांमार्फत त्यांना चौकशीसाठी येण्यासंबंधी नोटीस दिले आहे.
माहितीनुसार, मरकजप्रकरणी तपास करत असलेल्या गुन्हे शाखेच्या टीमने मौलाना सादसह त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. त्यानुसार मौलानाची तीन मुले युसूफ, मौलाना सईद आणि मौलाना सऊद हे पोलिसांच्या चौकशीला समोर गेले आहेत. तर, त्यांच्याव्यतिरिक्त साद यांच्या कुटुंबातील अन्य १४ जणांचीही गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. मात्र, मौलाना साद हा अद्याप गुन्हे शाखेच्या चौकशी प्रक्रियेत सहभागी झालेला नाही. त्यामुळे, पोलिसांमार्फत त्यांना परत एकदा चौकशीला येण्यासंदर्भात सांगण्यात आले.
मौलाना सादच्या अडचणीत वाढ -
मौलाना साद हा आत्ताही जाकिर नगरमध्येच राहात असून चौकशीला पुढे येत नसल्याचे गुन्हे शाखेने म्हटले आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याला गुन्हे शाखेने सदोष मानवहत्येच्या संदर्भात जोडले असून यामुळे साद याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जर, साद चौकशीला असेच अनुपस्थित राहिला तर, पोलिसांना छापेमारी करून त्याला अटक करावी लागेल, अशी माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली.