ETV Bharat / bharat

'सोशल डिस्टन्सिंग पाळा, नाही तर कारवाईला सामोरे जा'

author img

By

Published : Apr 6, 2020, 9:30 AM IST

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी लोकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. 'सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करा, नाही तर कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा', असा इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री नवीन पटनायक
मुख्यमंत्री नवीन पटनायक

भुवनेश्वर - देशामध्ये कोरोनीबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून ओडिशामध्ये 18 नविन रुग्ण आढळले आहेत. यावर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी लोकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. 'सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करा, नाही तर कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा', असा इशारा त्यांनी दिला.

राज्यात कोणीही लॉकडाऊनच्या नियमांचे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन केले नाही. तर त्यांच्याविरोधात शुन्य सहिष्णूता धोरण असून फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कोरोनाव्हायरस विरूद्धच्या लढाईत सहकार्य करण्याची प्रामाणिक विनंती नवीन पटनायक यांनी केली.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 39 वर पोहचला असून एकट्या भुवनेश्वरमध्ये 32 जण आढळले आहेत. लोकांनी घाबरून न जाता, लॉकडाउनचा आदर करून सरकारला सहकार्य करावे, असेही पटनायक म्हणाले.

दरम्यान कोरोनाचा परिणामकारक सामना करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे हाच उपाय असल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. संपूर्ण जगातील संशोधक कोरोनावर औषध शोधत आहेत. भारतातील संशोधकही लस शोधण्यावर काम करत आहेत. मात्र, आताच्या घडीला सामाजिक अंतर राखणे हाच परिणामकारक उपाय आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.