ETV Bharat / bharat

वायनाडमध्ये राहुल गांधीं विरोधात राहुल गांधी; मतदार संभ्रमित होण्याची शक्यता - wayanad

या तिघांपैकी दोघांची नावे चक्क के. ई. राहुल गांधी आणि के. के. राहुल गांधी अशी आहेत. तर, तिसऱ्याचे आडनाव गांधी आहे. नावातील साम्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा फटका काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी बसण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी
author img

By

Published : Apr 6, 2019, 11:50 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. वायनाड मतदारसंघात राहुल गांधींना थोडी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी राहुल गांधींच्या विरोधात तीन असे उमेदवार आहेत, ज्यांची नावं राहुल गांधींच्या नावाशी मिळती-जुळती आहेत.

गंमत म्हणजे या तिघांपैकी दोघांची नावे चक्क के. ई. राहुल गांधी आणि के. के. राहुल गांधी, अशी आहेत. तर, तिसऱ्याचे आडनाव गांधी आहे. नावातील साम्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा फटका काँग्रेस अध्यक्ष राहुल यांना बसण्याची शक्यता आहे.

वायनाडमधून लोकसभेसाठी उभे असलेले के. ई. राहुल गांधी हे ३३ वर्षांचे असून ते कोट्टायम जिल्ह्यातील आहेत. ते अपक्ष लढणार आहेत. अगीला इंडिया मक्कल कझगम पार्टीचे सदस्य के. के. राहुल गांधी ३० वर्षांचे असून ते कोईम्बतूरचे रहिवासी आहेत. तर, के. एम. शिवप्रसाद गांधी हे ४० वर्षीय असून ते त्रिसूरचे आहेत. हेही अपक्षच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन राहुल गांधी मैदानात उतरल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू आहे. आता वायनाड मतदार संघातून एकंदर ३ राहुल गांधी आणि चौथे फक्त गांधी आडनाव असलेले उमेदवार लोकसभा रणधुमाळीत उतरले आहेत.

वायनाड हा मतदारसंघ तामिळनाडू, कर्नाटक व केरळच्या सीमेवर आहे. दक्षिण भारतात काँग्रेसची हवा निर्माण करण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल यांनी या मतदारसंघाची निवड केल्याची चर्चा आहे.

त्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, के. ई. राहुल गांधी भाषाशास्त्रातून एम. फिल. आहेत. ते समाजसेवक असल्याने त्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही. त्यांची पत्नी गृहिणी असून तिच्याकडे पॅन क्रमांक आहे. त्यांच्याकडे ५ हजार रुपये रोख आणि बँकेमध्ये केवळ ५१५ रुपये आहेत. तसेच, त्यांच्या नावावर काहीही मालमत्ता नाही.

के. के. राहुल गांधी हे कोईम्बतूरमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत असून त्यांची पत्नी डेन्टल टेक्निशियन आहे. हे दोघेही करदाते असून त्यांचे उत्पन्न १ लाख ९९ हजार तर, त्यांच्या पत्नीचे उत्पन्न २ लाख रुपये आहे. या दोघांवर १ लाख ४५ हजारांचे कर्ज आहे.

के. एम. शिवप्रसाद गांधी हे संस्कृत शिक्षक असून त्यांची पत्नी कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. हे दोघेही करदाते आहेत. त्यांच्याकडे स्वतःची मालमत्ता असून कर्जही आहे.

Intro:Body:

वायनाडमध्ये राहुल गांधी विरोधात राहुल गांधी; मतदार संभ्रमित होण्याची शक्यता

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. वायनाड मतदारसंघात राहुल गांधींना थोडी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी राहुल गांधींच्या विरोधात तीन असे उमेदवार आहेत की ज्यांची नावं राहुल गांधींच्या नावाशी मिळती-जुळती आहेत.

गंमत म्हणजे या तिघांपैकी दोघांची नावे चक्क के. ई. राहुल गांधी आणि के. के. राहुल गांधी अशी आहेत. तर, तिसऱ्याचे आडनाव गांधी आहे. नावातील साम्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा फटका काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी बसण्याची शक्यता आहे.

वायनाडमधून के. ई. राहुल गांधी हे ३३ वर्षांचे असून ते कोट्टायम जिल्ह्यातील आहेत. ते अपक्ष लढणार आहेत. अगीला इंडिया मक्कल कझगम पार्टीचे सदस्य के. के. राहुल गांधी ३० वर्षांचे असून ते कोईम्बतूरचे रहिवासी आहेत. तर, के. एम.  शिवप्रसाद गांधी हे ४० वर्षीय असून ते त्रिसूरचे आहेत. हेही अपक्षच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन राहुल गांधी मैदानात उतरल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू आहे. आता वायनाड मतदार संघातून एकंदर ३ राहुल गांधी आणि चौथे फक्त गांधी आडनाव असलेले उमेदवार लोकसभा रणधुमाळीत उतरले आहेत.

वायनाड हा मतदारसंघ तामिळनाडू, कर्नाटक व केरळच्या सीमेवर आहे. दक्षिण भारतात काँग्रेसची हवा निर्माण करण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल यांनी या मतदारसंघाची निवड केल्याची चर्चा आहे.

त्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, के. ई. राहुल गांधी भाषाशास्त्रातून एम. फिल. आहेत. ते समाजसेवक असल्याने त्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही. त्यांची पत्नी गृहिणी असून तिच्याकडे पॅन क्रमांक आहे. त्यांच्याकडे ५ हजार रुपये रोख आणि बँकेमध्ये केवळ ५१५ रुपये आहेत. तसेच, त्यांच्या नावावर काहीही मालमत्ता नाही.

के. के. राहुल गांधी हे कोईम्बतूरमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत असून त्यांची पत्नी डेन्टल टेक्निशियन आहे. हे दोघेही करदाते असून त्यांचे उत्पन्न १ लाख ९९ हजार तर, त्यांच्या पत्नीचे उत्पन्न २ लाख रुपये आहे. या दोघांवर १ लाख ४५ हजारांचे कर्ज आहे.

के. एम. शिवप्रसाद गांधी हे संस्कृत शिक्षक असून त्यांची पत्नी कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. हे दोघेही करदाते असून त्या दोघांकडे स्वतःची मालमत्ता असून कर्जही आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.