नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून जनता दलाने (यु) चिराग पासवान यांच्यावर निशाणा साधला. या व्हिडिओमध्ये चिराग पासवान हे दिवंगत वडील रामविलास पासवान यांच्या फोटोसमोर शुट करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी ते रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषणाची प्रॅक्टिस करत असल्याचे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये चिराग पासवान वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषणाची प्रॅक्टिस करत आहेत. तर यावेळी भाषणाच्या काही ओळी विसरल्यानंतर पुन्हा शूट करण्यास सांगत आहेत. तसेच त्यांच्या आजू-बाजूला कॅमेरामन आणि इतर काही सहकारी असल्याचे दिसत आहे. रामविलास पासवान यांच्या फोटोसमोर शूट करताना चिराग पासवान हसत असल्याचंही दिसते. या व्हिडिओवरून विरोधकांनी टीका केल्यानंतर चिराग पासवान यांनी आणखी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
चिराग पासवान यांचे स्पष्टीकरण -
माझ्या चारित्र्यांवर नितिश कुमार यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. वडिलांच्या मृत्यूमुळे एका मुलाला किती दु:ख झाले, याचे प्रमाण द्यावे लागत आहे. तर ही राजकारणाची अत्यंत खालची पातळी आहे. वडिलांच्या निधनानंतर सहा तासातच मला पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी द्यायची होती. तसेच मला 10 दिवस मला घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे डिजिटल प्रचारासाठी मला व्हिडिओ शूट करणे भाग होतं. मुख्यमंत्री इतक्या खालच्या पातळीवर पोहचतील असं वाटलं नव्हतं, असे चिराग पासवान यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
-
पापा के निधन के 6 घंटे बाद ही मुझे पार्टी के प्रत्याशियों की पहली सूची देनी थी।मुझे पार्टी के भी सभी कार्यों को पूरा करना है। 10 दिनो तक मुझे घर से बाहर नहीं जाना था इस लिए डिजिटल प्रचार के लिए वीडियो शूट करना ही था। pic.twitter.com/nUUOaL9PZ2
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">पापा के निधन के 6 घंटे बाद ही मुझे पार्टी के प्रत्याशियों की पहली सूची देनी थी।मुझे पार्टी के भी सभी कार्यों को पूरा करना है। 10 दिनो तक मुझे घर से बाहर नहीं जाना था इस लिए डिजिटल प्रचार के लिए वीडियो शूट करना ही था। pic.twitter.com/nUUOaL9PZ2
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 27, 2020पापा के निधन के 6 घंटे बाद ही मुझे पार्टी के प्रत्याशियों की पहली सूची देनी थी।मुझे पार्टी के भी सभी कार्यों को पूरा करना है। 10 दिनो तक मुझे घर से बाहर नहीं जाना था इस लिए डिजिटल प्रचार के लिए वीडियो शूट करना ही था। pic.twitter.com/nUUOaL9PZ2
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 27, 2020
बिहारमधील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात -
बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागेसाठी आज मतदान होत आहे. यात दोन कोटींहून अधिक नागरिक 1 हजार 66 उमेदवारांमधून आपले आमदार निवडतील. कोविड काळात पहिल्यांदाच मतदान होत असून यात किती मतदार आपला हक्क बजावणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.