भारत आता अंतराळातही चौकीदारी करण्यास सक्षम - पंतप्रधान मोदी
लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदींनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. आज त्यांनी ओडिशाच्या कोरापूट येथे जनसभेला संबोधित केले. दरम्यान, अपल्या सरकारच्या यशाचे खरे वारसदार देशातील जनता आहे, असे ते यावेळी म्हणाले. तर, आता भारत अंतराळातही चौकीदारी करण्यास सक्षम झाला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. वाचा सविस्तर..
उमेदवारी अर्ज भरताना राजू शेट्टी सोबत योगेंद्र यादव; काय आहे संबंध?
लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कोल्हापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. गुरूवारपासूनच नामांकनासाठी नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटेचे नेते राजू शेट्टी यांनी समर्थकांच्या मोठ्या गर्दीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनात राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर..
'वाराणसीतून का नाही?' रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या प्रश्नाला प्रियंकांचा प्रतिप्रश्न
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रियांकांनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी त्यांना विनंती केली. यावर 'वाराणसीतून का नाही' (व्हाय नॉट वाराणसी?) असे प्रत्युत्तर प्रियांकांनी दिले. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान मोदी निवडणूक लढवत आहेत. वाचा सविस्तर..
मोदींसमोर तुल्यबळ उमेदवार; चंद्रशेखर आझादांना मिळणार वंचितांचा पाठिंबा
लोकसभा निवडणुकांना केवळ २ आठवडे शिल्लक आहेत. त्याबरोबरच निवडणुकांची रणधुमाळी वाढत चालली आहे. पंतप्रधान मोदींच्या विरोधात कोण उभे असणार याची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद यांनी मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर एकतर्फी होणारी लढत आता 'कांटे की टक्कर'मध्ये परिवर्तीत झाली आहे. वाचा सविस्तर..
ममताजींचा 'जुमला मीटर' मोदींच्या अनेक घोषणांना ठरवतोय खोटे
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्व पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसुद्धा मागे नाहीत. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या 'नाकात दम' केल्यानंतर आता त्यांनी पंतप्रधान मोदीं विरोधात 'वेब वार' छेडला आहे. तृणमूल काँग्रेसच्या वेबसाईटवर त्यांनी जुमला मिटर नावाचे एक वेगळेच फिचर जोडले आहे. या फिचरवरून राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा रंगत आहे. वाचा सविस्तर..
'मोदींनी २०१४ पूर्वी लढवलेल्या निवडणुकांचे अर्ज भरताना लग्नाचा दाखला दिला नाही'
लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमिवर आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०१४पूर्वीच्या निवडणुकांचे अर्ज भरताना आपल्या लग्नाचा दाखलाच दिला नाही, असा आरोप काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आज केला. वाचा सविस्तर..