नवी दिल्ली - या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पार पडले. भारतात काही ठिकाणी कंकणाकृती, तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. तर, दुबईमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळाले. सकाळी आठच्या दरम्यान सुरू झालेले हे सूर्यग्रहण अकराच्या दरम्यान संपले.
मुंबईमध्ये ढगाळ वातावरणामुळे सूर्याचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे, खगोलशास्त्रप्रेमींची काहीशी निराशा होताना दिसून आली. दुसरीकडे दक्षिण भारतातील तिरूअनंतपूरम, चेन्नई या शहरांमध्ये स्पष्टपणे सूर्यग्रहण दिसून आले. देशातील ओडिशा, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांमध्येही हे ग्रहण दिसून आले.
भारताबाहेर, श्रीलंका, मलेशिया, युनायटेड अरब इमिराती, सौदी अरेबिया, कतार, इंडोनेशिया, सिंगापूर, ओमान आणि गुआम या देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसून आले. ठिकठिकाणी हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
दुबईमध्ये दिसले कंकणाकृती सूर्यग्रहण..
भारतात जवळपास सगळीकडे खंडग्रास सूर्यग्रहण दिसून आले. मात्र, दुबईमध्ये पूर्णपणे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसून आले. या सूर्यग्रहणाला 'रिंग ऑफ फायर'ही म्हणतात.
-
Solar eclipse witnessed in Dubai. #SolarEclipse https://t.co/rBM3tCDaTv pic.twitter.com/y9jmsR85lu
— ANI (@ANI) December 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Solar eclipse witnessed in Dubai. #SolarEclipse https://t.co/rBM3tCDaTv pic.twitter.com/y9jmsR85lu
— ANI (@ANI) December 26, 2019Solar eclipse witnessed in Dubai. #SolarEclipse https://t.co/rBM3tCDaTv pic.twitter.com/y9jmsR85lu
— ANI (@ANI) December 26, 2019
ढगाळ वातावरणामुळे पंतप्रधान मोदीही निराश..
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सूर्यग्रहण पाहण्यास उत्सुक होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे त्यांना हे ग्रहण थेट पाहता आले नाही. त्यामुळे त्यांना कोझीकोड आणि इतर भागातून होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या थेट प्रक्षेपणावर समाधान मानावे लागले. यासोबतच, त्यांनी या विषयातील तज्ज्ञांशी चर्चा करून ग्रहणाबाबत अधिक माहितीही मिळवली.
-
PM Modi tweets,"Like many Indians, I was enthusiastic about #SolarEclipse. Unfortunately, I could not see Sun due to cloud cover but I did catch glimpses of eclipse in Kozhikode & other parts on live stream. Also enriched my knowledge on the subject by interacting with experts." pic.twitter.com/s97rELVuMW
— ANI (@ANI) December 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM Modi tweets,"Like many Indians, I was enthusiastic about #SolarEclipse. Unfortunately, I could not see Sun due to cloud cover but I did catch glimpses of eclipse in Kozhikode & other parts on live stream. Also enriched my knowledge on the subject by interacting with experts." pic.twitter.com/s97rELVuMW
— ANI (@ANI) December 26, 2019PM Modi tweets,"Like many Indians, I was enthusiastic about #SolarEclipse. Unfortunately, I could not see Sun due to cloud cover but I did catch glimpses of eclipse in Kozhikode & other parts on live stream. Also enriched my knowledge on the subject by interacting with experts." pic.twitter.com/s97rELVuMW
— ANI (@ANI) December 26, 2019
हेही वाचा : सूर्यग्रहणादरम्यान भारतातील हे एकमेव मंदिर असते खुले; राहू-केतू पूजेसाठी भाविकांची गर्दी