पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात ट्विटरवरून एनडीए सरकारवर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी कोरोना काळातील सरकारच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या कामकाजावर गंभीर आरोप केले.
-
यह ड़बल इंजन नहीं ट्रबल इंजन है।
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) November 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
लॉकडाउन में फँसे मज़दूरों को वापस लाने के वक़्त ड़बल इंजन कहाँ था?
">यह ड़बल इंजन नहीं ट्रबल इंजन है।
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) November 1, 2020
लॉकडाउन में फँसे मज़दूरों को वापस लाने के वक़्त ड़बल इंजन कहाँ था?यह ड़बल इंजन नहीं ट्रबल इंजन है।
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) November 1, 2020
लॉकडाउन में फँसे मज़दूरों को वापस लाने के वक़्त ड़बल इंजन कहाँ था?
लालू प्रसाद यादव यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून लिहिले आहे की, हे 'डबल इंजिन' नसून 'ट्रबल इंजिन' आहे. टाळेबंदीवेळी अडकलेल्या मजुरांना परत आणताना हे डबल इंजिन कोठे होते? याआधीही लालू यादव यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून नितीशकुमार यांना टोले लगावले आहेत. त्यांनी नितीशकुमार यांना 'मुख्य मौका मंत्री', असे म्हटले आहे. या बरोबरच त्यांनी उपमुख्यमंत्री सुशील मोदींवरही टीका केली. त्यांनी सुशील मोदींना उप मुख्य धोका मंत्री, असे संबोधले.
नितीश यांच्या मानेच्या मागच्या बाजूला चष्मा
याशिवाय बिहार निवडणुकीत उमेदवाराची हत्या केल्यावरून त्यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली. नितीशराजमध्ये एका उमेदवाराला गोळ्या घालून ठार मारले जाते आणि हे सरकार स्वत:ला सुशासन म्हणवून घेते. नितीश यांनी मानेला मागच्या बाजूला चष्मा लावला आहे, त्यामुळे त्यांना फक्त मागचा भाग दिसतो. बिहारचे वर्तमान व भविष्य बिघडलेले असताना ते फक्त भूतकाळात रममाण आहेत.
चारा घोटाळा प्रकरणात आरजेडी सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव सध्या रांची तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र, ट्विटर हँडलवरून ते सतत विरोधकांना लक्ष्य करीत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबर रोजी संपले आहे. त्याचबरोबर, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान 3 आणि 7 नोव्हेंबरला होणार आहे. 10 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. मतदानाच्या दुसर्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा आता बसला आहे.