ETV Bharat / bharat

बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख; चूक उमगताच विद्यापीठाचा माफीनामा

author img

By

Published : Dec 7, 2019, 3:15 AM IST

हा प्रकार समोर येताच विद्यापीठाने माफीनामा जाहीर केला. ज्या प्राध्यापकाने या विषयाचे पेपर सेटींग केले आहे; त्याची चौकशी करून विद्यापीठ नियमानुसार कारवाई केली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने माफीनाम्यात म्हटले आहे.

Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University apologies
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत 'मराठ्यांचा इतिहास' या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, ही चूक लक्षात येताच विद्यापीठाने दिलगिरी व्यक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

एकाच प्रश्नपत्रिकेत 5 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने संतप्त पवित्रा घेतला. हा प्रकार निंदनीय व खेदजनक आहे. ही चूक जाणीवपूर्वक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाचे पेपर सेट करणारे जे प्राध्यापक आहेत, ही चूक त्यांच्या लक्षात कशी आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठाकडून माफीनामा-

हा प्रकार समोर येताच विद्यापीठाने माफीनामा जाहीर केला. ज्या प्राध्यापकाने या विषयाचे पेपर सेटींग केले आहे; त्याची चौकशी करून विद्यापीठ नियमानुसार कारवाई केली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने माफीनाम्यात म्हटले आहे. विद्यापीठाच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी हा माफीनामा प्रसिद्धीला दिला आहे.

Intro:जळगाव
येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत 'मराठ्यांचा इतिहास' या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, ही चूक लक्षात येताच विद्यापीठाने दिलगिरी व्यक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.Body:एकाच प्रश्नपत्रिकेत पाच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने संतप्त पवित्रा घेतला. हा प्रकार निंदनीय व खेदजनक आहे. ही चूक जाणीवपूर्वक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाचे पेपर सेट करणारे जे प्राध्यापक आहेत, ही चूक त्यांच्या लक्षात कशी आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.Conclusion:विद्यापीठाकडून माफीनामा-

हा प्रकार समोर येताच विद्यापीठाने माफीनामा जाहीर केला. ज्या प्राध्यापकाने या विषयाचे पेपर सेटींग केले आहे; त्याची चौकशी करून विद्यापीठ नियमानुसार कारवाई केली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने माफीनाम्यात म्हटले आहे. विद्यापीठाच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी हा माफीनामा प्रसिद्धीला दिला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.