मुंबई - Ranbir Kapoor Dhoom 4: अभिनेता रणबीर कपूर आज त्याचा 42वा वाढदिवस साजरा करत आहे. काल रात्री रणबीरनं त्याच्या मित्रांबरोबर वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं होतं. दरम्यान आता या विशेष प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते सोशल मीडियावर रणबीर कपूरला शुभेच्छा देत आहेत. रणबीरनं त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. यशराज बॅनरच्या सर्वात मोठ्या ॲक्शन फ्रँचायझी 'धूम 4' मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ही बातमी रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची आहे.
रणबीर कपूर बनणार 'धूम ४'मध्ये खलनायक? : चित्रपट समीक्षक सुमित कडेल यांनी सोशल मीडियावर रणबीर कपूरला 'धूम 4' चित्रपटासाठी फायनल केल्याची पुष्टी केली आहे. निर्मात्यांनी अद्याप याबद्दची कोणतीही घोषणा केलेली नाही. तरी यशराज फिल्म्सनं रणबीर कपूरला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'धूम 4'मध्ये रणबीर कपूरच्या एन्ट्रीची पुष्टी झाल्याची बातमी सोशल मीडियावर वेगानं पसरत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. समीक्षकांच्या इंस्टाग्राम पोस्टवर यूजर्स भरपूर कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं लिहिलं आहे की, 'तुम्ही हृतिक आणि जॉनला एकत्र का आणत नाही?' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'चित्रपट सुपरफ्लॉप असेल.' आणखी एका यूजरनं लिहिलं की, 'शाहरुख खानला घ्यायला हवे होते.'
Ranbir Kapoor locked for Dhoom 4 #HappyBirthdayRanbirKapoor pic.twitter.com/WAfhhxMhmx
— ᴅᴀɴɢᴇʀ. (@KapoorDefender0) September 28, 2024
'धूम' सीरीज : रणबीर कपूर गेल्या वर्षी सुपरहिट ठरलेल्या 'ॲनिमल' या चित्रपटात एका भयानक भूमिकेत दिसला होता. तेव्हापासून बॉलिवूडमध्ये रणबीरची मार्केट व्हॅल्यू चांगलीच वाढली आहे. दरम्यान 'धूम' 27 ऑगस्ट 2004 रोजी रिलीज झाला होता. 'धूम 2' 2006 मध्ये रिलीज झाला होता आणि 'धूम 3' 2013 मध्ये रिलीज झाला होता. धूम सीरिजनं बॉक्स ऑफिसवर चांगलेच पैसे छापले आहेत. आता गेल्या 9 वर्षांपासून 'धूम 4'ची प्रतीक्षा सुरू आहे, मात्र आतापर्यंत निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणाही केलेली नाही. आज रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त 'धूम 4'ची घोषणाही केली जाऊ शकते.
हेही वाचा :
- रणबीर कपूरचा वाढदिवस झाला भव्य, आकाश अंबानींपासून ते अर्जुन कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी लावली हजेरी - Ranbir Kapoor Birthday
- आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा झाली आजी नीतू कपूरला पाहून सरप्राईज, व्हिडिओ व्हायरल - raha kapoor
- बॉक्स ऑफिसवर 'किंग' विरुद्ध 'लव्ह अँड वॉर', 19 वर्षांनंतर शाहरुख आणि रणबीरमध्ये होईल संघर्ष - SRK and Ranbir Kapoor