कानपूर IND vs BAN 2nd Test Day 2 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याचा दुसरा दिवस (28 सप्टेंबर) पावसामुळं पूर्णपणे वाहून गेला. दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशची पहिल्या डावात तीन विकेट्सवर 107 धावा आहेत. मोमिनुल हक 40 आणि मुशफिकर रहीम 6 धावांवर नाबाद आहेत. शनिवारी कानपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळं खेळ सुरु होण्यासाठी परिस्थिती योग्य नव्हती.
Update from Kanpur 🚨
— BCCI (@BCCI) September 28, 2024
Play has been called off for Day 2 due to rains.#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/HD98D6LK9K
पहिल्या दिवशी 35 षटकांचा खेळ : खराब प्रकाश आणि पावसामुळं पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचाच खेळ होऊ शकला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. त्या सामन्यात रविचंद्रन अश्विननं अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती.
बांगलादेशची खराब सुरुवात : या सामन्यात प्रथम फलंदाजीला आल्यावर बांगलादेशनं चांगली सुरुवात केली. पण या सामन्यात षटक टाकायला आलेल्या आकाश दीपनं झाकीर हसनला स्लिपमध्ये यशस्वी जैस्वालकडं झेलबाद केलं. त्यावेळी बांगलादेश संघाची धावसंख्या 26 धावा होती. धावफलकावर अवघ्या 29 धावा असताना आकाश दीपनं शदमान इस्लामला (24) पायचीत पकडलं. उपाहारापर्यंत बांगलादेशची धावसंख्या 74/2 होती. मात्र उपाहारानंतर लगेचच कर्णधार नझमुल हुसेन शांतो (31) अश्विनच्या चेंडूवर पायचीत झाला.
INDIA VS BANGLADESH IN KANPUR:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2024
Day 1 - Called Off due to rain after 35 overs.
Day 2 - Called Off due to rain without a single ball being bowled. pic.twitter.com/lUY4v01euc
17 मालिकांपासून भारत अजिंक्य : घरच्या भूमीवर भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. 2012 पासून भारतीय संघ घरच्या मैदानावर चांगली खेळली आहे. त्यानंतर भारतानं घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. म्हणजेच नोव्हेंबर 2012 पासून भारत सलग 17 घरच्या कसोटी मालिकेत अपराजित आहे. दुसरीकडे बांगलादेशी संघ पाकिस्तानला मालिकेत 2-0 ने पराभूत करुन भारतात आला आहे.
हेही वाचा :