ETV Bharat / bharat

करतारपूर : सुरक्षेसंबंधी पाकिस्तान अजूनही गंभीर नाहीच! - गुरुद्वारा करतारपूर साहिब

सुरक्षा व्यवस्थेसंबंधी पाकिस्तानशी चर्चा सुरु आहे, महत्त्वाच्या व्यक्ती करतारपूरला जाण्याआधी एका विशेष पथकाने जाऊन पाहणी करण्याची मागणी रास्त आहे. मात्र, त्यावर पाकिस्तानने अजून काही प्रतिक्रिया दिली नाही. करतारपूर गुरुद्वारामधील कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधी पाकिस्तान अजूनही गंभीर नसल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे.

Kartarpur Program Pak still not serious about scurity issues
author img

By

Published : Nov 7, 2019, 5:22 PM IST

नवी दिल्ली - करतारपूर गुरुद्वारामधील कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधी पाकिस्तान अजूनही गंभीर नसल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

पाकिस्तानकडून सातत्याने विरोधाभासात्मक माहिती मिळत आहे, कधी ते म्हणतात की शीख भाविकांना करतारपूरला जाण्यासाठी पारपत्राची गरज नाही, कधी म्हणतात की पारपत्र आवश्यक आहे. पाकिस्तानसह झालेल्या द्विपक्षीय चर्चेत यासंबंधी आवश्यक त्या कागदपत्रांबाबत आधीच चर्चा झाली आहे. त्यामध्ये कोणताही देश (पाकिस्तान किंवा भारत) स्वतः बदल नाही करू शकत. आधी झालेल्या चर्चेनुसार पारपत्र हे आवश्यक आहेच! सुरक्षा व्यवस्थेसंबंधी पाकिस्तानशी चर्चा सुरु आहे, महत्त्वाच्या व्यक्ती करतारपूरला जाण्याआधी एका विशेष पथकाने जाऊन पाहणी करण्याची मागणी रास्त आहे. मात्र, त्यावर पाकिस्तानने अजून काही प्रतिक्रिया दिली नाही. ९ नोव्हेंबरला करतारपूरला भाविकांचा पहिला जत्था जाणार आहे, यामधील लोकांची यादी पाकिस्तानने तपासून नक्की केली असल्याची आशा यावेळी कुमार यांनी व्यक्त केली. म्हणजेच, पाकिस्तानने ही यादी नक्की केल्याची माहिती अजूनही भारत सरकारकडे नाही. तरीही, कुमार यांनी भाविकांना यात्रेसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

हेही वाचा : पंजाबमध्ये लागले इम्रान खान-सिद्धूचे पोस्टर्स, भाजपने साधला निशाणा

Intro:Body:

करतारपूर : सुरक्षेसंबंधी पाकिस्तान अजूनही गंभीर नाहीच!

नवी दिल्ली - करतारपूर गुरुद्वारामधील कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधी पाकिस्तान अजूनही गंभीर नसल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

पाकिस्तानकडून सातत्याने विरोधाभासात्मक माहिती मिळत आहे, कधी ते म्हणतात की शीख भाविकांना करतारपूरला जाण्यासाठी पारपत्राची गरज नाही, कधी म्हणतात की पारपत्र आवश्यक आहे. पाकिस्तानसह झालेल्या द्विपक्षीय चर्चेत यासंबंधी आवश्यक त्या कागदपत्रांबाबत आधीच चर्चा झाली आहे. त्यामध्ये कोणताही देश (पाकिस्तान किंवा भारत) स्वतः बदल नाही करू शकत. आधी झालेल्या चर्चेनुसार पारपत्र हे आवश्यक आहेच!

सुरक्षाव्यवस्थेसंबंधी पाकिस्तानशी चर्चा सुरु आहे, महत्त्वाच्या व्यक्ती करतारपूरला जाण्याआधी एका विशेष पथकाने जाऊन पाहणी करण्याची मागणी रास्त आहे. मात्र, त्यावर पाकिस्तानने अजून काही प्रतिक्रिया दिली नाही. ९ नोव्हेंबरला करतारपूरला भाविकांचा पहिला जथा जाणार आहे, यामधील लोकांची यादी पाकिस्तानने तपासून नक्की केली असल्याची आशा यावेळी कुमार यांनी व्यक्त केली. म्हणजेच, पाकिस्तानने ही यादी नक्की केल्याची माहिती अजूनही भारत सरकारकडे नाही. तरीही, कुमार यांनी भाविकांना यात्रेसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

हेही वाचा :

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.