ETV Bharat / bharat

कर'नाटक' : बंडखोर आमदार राजीनामा दिल्यानंतर पुन्हा मुंबईत परतले - हॉटेल

सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांची काल सायंकाळी ६ पर्यंत भेट घेण्यास सांगितले होते. राजीनामा दिल्यानंतर आज रात्री आमदार मुंबईतील हॉटेल रेनायसन्समध्ये माघारी परतले आहेत. वाचा सविस्तर...

बंडखोर आमदार राजीनामा दिल्यानंतर मुंबईत परतले
author img

By

Published : Jul 12, 2019, 8:46 AM IST

Updated : Jul 12, 2019, 11:11 AM IST

मुंबई - कर्नाटकातील १८ आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर काँग्रेस-जेडीएस आता सत्तेतून पायउतार होण्याच्या मार्गावर आहे. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामे स्वीकारले नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व बंडखोर आमदारांना काल (गुरुवार) दुसऱ्यांदा राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र, काल विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवल्यानंतर ते सर्व आमदार आज (शुक्रवार) पुन्हा मुंबईत माघारी परतले आहेत.

बंडखोर आमदार राजीनामा दिल्यानंतर पुन्हा मुंबईत परतले

कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी राजीनामे दिले होते. विधानसभा अध्यक्ष के.आर रमेशकुमार यांनी आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर, आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने प्रकरणावर निर्णय देताना आमदारांना विधानसभा अध्यक्षांची काल सायंकाळी ६ पर्यंत भेट घेण्यास सांगितले होते. यामुळे मुंबईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले आमदार काल विमानाद्वारे बंगळुरूला गेले होते. विधानसभा अध्यक्षांची भेट घेत आमदारांनी दुसऱ्यांदा राजीनामे दिले. राजीनामा दिल्यानंतर आमदार विमानाद्वारे बंगळुरू येथून मुंबईला आले. आज रात्री आमदार मुंबईतील हॉटेल रेनायसन्समध्ये माघारी परतले आहेत.

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांनी दुसऱ्यांदा राजीनामे दिले आहेत. परंतु, विधानसभा अध्यक्ष के. आर रमेशकुमार यांनी अद्याप राजीनामे मंजुर केले नाहीत. आमदारांनी कोणत्या दबावाखाली राजीनामे सादर केले आहेत का? याची तपासणी करुन राजीनाम्यांवर निर्णय घेण्यात येईल, असे रमेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 12, 2019, 11:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.