ETV Bharat / bharat

कर'नाटक' : बंडखोर आमदार शिर्डीत साईंच्या चरणी; युवक काँग्रेसची जोरदार निदर्शने - विमानतळ

काँग्रेस-जेडीएसचे बंडखोर आमदार शिर्डीत येणार असल्यामुळे विमानतळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कर्नाटक आमदार
author img

By

Published : Jul 13, 2019, 1:27 PM IST

Updated : Jul 13, 2019, 1:48 PM IST

अहमदनगर - कर्नाटकात सुरू असलेले राजकीय नाट्य काही संपताना दिसून येत नाही. दुसऱ्यांदा राजीनामा देऊन बंडखोर आमदार बंगळुरूहून मुंबईला माघारी परतले आहेत. काल(शुक्रवारी) आमदारांनी मुंबईतील सिद्धीविनायकचे दर्शन घेतल्यानंतर आज ते शिर्डीतील साईचे दर्शन घेणार आहेत.

काँग्रेस-जेडीएसचे बंडखोर आमदार शिर्डीत येणार असल्यामुळे विमानतळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आमदारांची आणि माध्यमांची भेट टाळण्यासाठी विमानतळावर माध्यमांना बंदी घालण्यात आली आहे. बंडखोर आमदार विमानतळावरुन साईच्या दर्शनाला जाताना युवक काँग्रेसने निदर्शने केली आहेत.

कर्नाटक आमदार शिर्डीत दाखल

काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी दिलेले राजीनामे विधानसभा अध्यभ के. आर रमेशकुमार यांनी अद्याप मंजुर केले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी रमेशकुमार यांना मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे.

कर्नाटकचा राजकीय पेच अजूनही सुटलेला नाही. राजीनामा दिलेले आमदार निवांत वेळ घालवत आहेत. शनी शिंगणापूर व साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार आहेत ते स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

कर्नाटकचे आमदार राजीनामा दिल्यापासून मुंबईतच होते. मुंबईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये ते वास्तव्यास होते. नाट्यमय घडामोडींनतर सर्वाेच्च न्यायालयाने आमदारांच्या राजीनाम्याला मंगळवारपर्यंत स्थगिती दिली आहे. विधानसभा अध्यक्षांना राजीनामे न स्वीकारण्याबद्दल निर्देश दिले आहेत. मात्र, सर्व काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार राजीनाम्यावर ठाम आहेत. राजीनामा स्वीकारल्यानंतर आमदारांची पुढली दिशा काय असेल, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही.

बंडखोर आमदार कोणत्या पक्षाला पाठींबा देणार त्याबाबत आता देव दर्शनानंतर समजणार असल्याचेही बोलले जाते. त्यावरून दर्शन होईपर्यंत कर्नाटक नाट्याला कसा विराम मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:Body:

Shirdi Breaking News....

कर्नाटक राजकारणातील हाय व्होल्टेज ड्रामा....

शिर्डी एअरपोर्ट परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त...

एअरपोर्ट परिसरात मिडीयास आत जाण्यास मज्जाव...

कर्नाटकचे बंडखोर आमदार शिर्डीला साईदर्शनासाठी येणार असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात....

थोडयाच वेळात बंडखोर आमदार एअरपोर्टवर पोहचणार...

मंदिर परिसरातही मोठा पोलिस बंदोबस्त...

Conclusion:
Last Updated : Jul 13, 2019, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.