ETV Bharat / bharat

यूपी पोलीस हत्याकांड : विकास दुबेचा 'राईट हॅन्ड' अमरला पोलिसांनी घातल्या गोळ्या - कानपूर विकास दुबे न्यूज

युपीतील पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा साथीदार अमर दुबे याला एसटीएफ उत्तर प्रदेश आणि स्थानिक पोलिसांनी चकमकीत कठंस्नान घातले. ही चकमक जनपद हमीरपूर मौदहा पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाली.

Kanpur encounter case: Amar Dubey, close aide of history-sheeter Vikas Dubey, has been killed in an encounter
यूपी पोलीस हत्याकांड : विकास दुबेचा 'राईट हॅन्ड' अमरला पोलिसांनी घातल्या गोळ्या
author img

By

Published : Jul 8, 2020, 9:13 AM IST

Updated : Jul 8, 2020, 9:31 AM IST

हमीरपूर (उत्तर प्रदेश) - युपीतील पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा साथीदार अमर दुबे याला एसटीएफ उत्तर प्रदेश आणि स्थानिक पोलिसांनी चकमकीत कठंस्नान घातले. ही चकमक जनपद हमीरपूर मौदहा पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाली. दरम्यान अमर दुबे याच्या नावावर गुन्हा दाखल आहे.

  • Kanpur encounter case: Amar Dubey, close aide of history-sheeter Vikas Dubey, has been killed in an encounter with Uttar Pradesh Special Task Force (STF) in Hamirpur today. pic.twitter.com/dygqgNaUNP

    — ANI UP (@ANINewsUP) July 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसरीकडे याच पोलीस हत्याकांड प्रकरणी ४० पोलिसांच्या टीम, गँगस्टर विकास दुबे याला पकडण्यासाठी गठित करण्यात आल्या आहेत. पोलिसांना विकास दुबे फरिदाबादमध्ये लपल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी तो थांबलेल्या हॉटेलवर छापा मारला. पण या छाप्यात विकास दुबेला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. मात्र, पोलिसांनी या छाप्यात विकास दुबे याच्या एका नातेवाईकाला अटक केली. सूत्रांच्या माहितीनुसार, याच हॉटेलमध्ये विकास दुबेही लपला होता.

दरम्यान, कानपूरमधील बिक्रू खेड्यात विकास दुबे याच्या टोळीवर छापा टाकताना झालेल्या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेचा शोध घेत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दुबेला पकडण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. विकास दुबेचा राज्यभरात शोध सुरू आहे.

कानपूरमध्ये अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गोळीबार झाल्याच्या घटनेपासून दुबे फरार आहे. पोलिसांनी दुबेची माहिती देणाऱ्यांना अडीच लाख रुपये इनामाची रक्कम देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी केली आहे. या प्रकरणी कानपूर पोलिसांनी दुबे यांचे निकटवर्तीय असलेल्या जय बाजपेयी यांच्या घरीही छापा टाकला. मात्र अद्याप त्याचा अद्याप सुगावा लागलेला नाही.

हेही वाचा - पाकिस्तानकडून पुंछमध्ये शस्त्रसंधीचे उल्लघंन; एक नागरिक जखमी

हेही वाचा - सोने तस्करी प्रकरणातील चौकशीसाठी युएई वाणिज्य दूतावास सहकार्य करण्यास तयार

Last Updated : Jul 8, 2020, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.