ETV Bharat / bharat

'बाबा नाही दादा!'... ट्विटरवर कंगना ट्रोल! - kangana ranaut on dadasaheb falke

अभिनेत्री कंगना रणौत हीने भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रणेते दादासाहेब फाळके यांचे नाव चुकीचे ट्विट केल्याने तिच्याबद्दल सुरू असणारी कॉन्ट्रोव्हर्सी आणखी वाढली आहे. आता चित्रपट सृष्टीतील विविध मान्यवरांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

kangana ranaut tweet
अभिनेत्री कंगना रणौत हीने भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रणेते दादासाहेब फाळके यांचे नाव चुकीचे ट्विट केल्याने तिच्याबद्दल सुरू असणारी कॉन्ट्रोव्हर्सी आणखी वाढली आहे.
author img

By

Published : Sep 15, 2020, 2:43 PM IST

Updated : Sep 15, 2020, 4:23 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत हीने भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रणेते दादासाहेब फाळके यांचे नाव चुकीचे ट्विट केल्याने कंगनाबद्दल कॉन्ट्रोव्हर्सी आणखी वाढली आहे. आता चित्रपट सृष्टीतील विविध मान्यवरांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

kangana ranaut news
'बाबा नाही दादा!'... ट्विटरवर कंगना ट्रोल!

सध्या कंगना रणौत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांच्या वर केलेल्या टीकांमुळे चर्चेत आहे. आजच कंगनाने खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणावर आक्षेप नोंदवत आणखी नव्या वादाला तोंड फोडले. सध्या कंगनाचे ट्विटर हॅन्डल देखील चांगलेच अॅक्टिव्ह आहे. भारतीय सिने सृष्टीतील प्रस्थापित घराण्यांना त्याद्वारे लक्ष केले आहे.

अशाच एका ट्विटर वॉर मध्ये कंगनाने सिनेदिग्दर्शक करण जोहरवर टीका केली आहे. फिल्म इन्डस्ट्री फक्त तुमच्या वडिलांनी बनवली नसल्याची टीका तिने केली आहे. तसेच ही इन्डस्ट्री दादासाहेब फाळकेंपासून अनेक कलाकार आणि मजूरांनी उभारल्याचे तिने सांगितले. या ट्विटमध्ये कंगनाने दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केल्याने तिला काही नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात संबंधित ट्विटमुळे कंगनाच्या कॉन्ट्रोव्हर्सीला आणखी फोडणी बसण्याची शक्यता आहे.

Last Updated : Sep 15, 2020, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.