ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये चकमक, २ दहशतवाद्यांचा खात्मा - security forces

याआधी १६ मे रोजी चकमक झाली होती. यामध्ये पुलवामाच्या दलिपोरा भागात ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते.

कुलगाममध्ये चकमक
author img

By

Published : May 22, 2019, 9:13 AM IST

Updated : May 22, 2019, 9:35 AM IST

गोपालपोरा - जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये बुधवारी रात्री उशिरा चकमक सुरू झाली. २ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश आले आहे.

याआधी १६ मे रोजी चकमक झाली होती. यामध्ये पुलवामाच्या दलिपोरा भागात ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाच्या एका जवानालाही वीरमरण आले होते.

पुलवामा येथील दलिपोरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त टीमला मिळाली होती. जवानांनी या भागाला घेरले होते. यानंतर या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही याला चोख प्रत्युत्तर देताना ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

त्याआधी रविवारी (१२ मे) काश्मीरमधील शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी ३ दहशतवादी ठार झाले होते. हे दोन्ही दहशतवादी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते.

Intro:Body:

road accident in gujarat 10 killed 6 injured

road accident, gujarat, killed, injured

---------------

गुजरातमध्ये भीषण अपघातात १० ठार, ६ गंभीर जखमी

आनंद - गुजरातमध्ये भीषण अपघातात १० जण ठार तर, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. टँकर, ट्रक आणि पिक-अप व्हॅनची जोरदार धडक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आनंद जिल्ह्यातील अंकलाव तालुक्यात गंभीरा गावाजवळ हा अपघात झाला.

सर्व मृत बोरसाड तालुक्यातील रहिवासी होते. ते सर्वजण बदोडा येथील खासगी कंपनीतील कर्मचारी असून आनंदच्या दिशेने निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना बडोदा आणि बोरसाड येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Conclusion:
Last Updated : May 22, 2019, 9:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.