रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार दुपारी २ वाजेपर्यंत राज्यामध्ये ५८.८८ टक्के मतदान झाले आहे. एकून ५ टप्प्याांमध्ये झारखंड विधानसभेसाठी मतदान होत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १३ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागातील असल्यामुळे पोलीस आणि सुरक्षा दलांनी कंबर कसली आहे.
हेही वाचा - खळबळजनक! हैदराबादमध्ये पुन्हा आढळला महिलेचा जळालेला मृतदेह
-
Jharkhand: Outside visuals from a polling booths in Lohardaga, ahead of the voting for Assembly elections. Voting on 13 constituencies in the state for the first phase of elections will be held today. pic.twitter.com/GEArmaDKXu
— ANI (@ANI) November 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Jharkhand: Outside visuals from a polling booths in Lohardaga, ahead of the voting for Assembly elections. Voting on 13 constituencies in the state for the first phase of elections will be held today. pic.twitter.com/GEArmaDKXu
— ANI (@ANI) November 30, 2019Jharkhand: Outside visuals from a polling booths in Lohardaga, ahead of the voting for Assembly elections. Voting on 13 constituencies in the state for the first phase of elections will be held today. pic.twitter.com/GEArmaDKXu
— ANI (@ANI) November 30, 2019
१३ जागांसाठी १८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील ६ जिल्ह्यामधील मतदारसंघामध्ये ही निवडणूक सुरू आहे. ४ हजार ८९२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यातील १ हजार ०२ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत, तर १ हजार ७९० मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव १२७ मतदानकेंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विनय कुमार चौबे यांनी दिली.
हेही वाचा - संतापजनक! एक लीटर दूधात बादलीभर पाणी मिसळून दिले 81 मुलांना, माध्यान्ह भोजनावेळचा प्रकार
संवेदनशील भागामध्ये सीआरपीएफ आणि बीएसएफकडे सुरक्षा व्यवस्था सोपवण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ३३० नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम राबवण्यात आली. निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचवण्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात येत आहे.
१३ मतदारसंघाची नावे -
चतरा मतदारसंघ, विशुनपूर मतदारसंघ, लोहरदगा मतदारसंघ, मनिका मतदारसंघ, लातेहार मतदारसंघ, पांकी मतदारसंघ, डालटनगंज मतदारसंघ, विश्रामपूर मतदारसंघ, छतरपूर मतदारसंघ, हुसेनाबाद मतदारसंघ, गढवा मतदारसंघ, भवनाथपूर मतदारसंघ