नवी दिल्ली - फ्रान्सचे विदेश राज्यमंत्री जीन बॅप्टीस्ट लेमोयने यांनी सोमवारी भारताचे विदेश राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दहशतवाद आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या विरोधात लढाईसाठी फ्रान्स भारतासोबत नेहमी उभा आहे.
जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय आंतकवादी म्हणून घोषित केल्याबाबत लेमोयने म्हणाले, दहशतवादाला संपवणे ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी फ्रान्स भारतासोबत उभा आहे. अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी फ्रान्स खंबीररित्या भारतासोबत उभा राहिला. पुलवामा हल्ल्यानंतर अझहरविरोधात फ्रान्सने भारताला साथ दिली आहे.
लेमोयने म्हणाले, राष्ट्रपती इम्यानुअल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगले सबंध आहेत. यासाठी मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना जी-७ देशांच्या बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदींसोबत बैठक ही द्विपक्षीय संबंधांना पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना मजबूती मिळेल.