श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यातून पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी लष्कर-ए-तैयबा संघटनेचा सदस्य असल्याची माहिती पुढे आली आहे. 'स्पेशल ऑपरेशन ग्रुप'ने शनिवारी कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा - इम्रान खान यांनी भारताविषयी शेअर केला व्हिडिओ... पण, निघाला खोटा; ट्विट डिलीट करण्याची नामुष्की
नासिर दार असे या दहशतवाद्याचे नाव असून तो उत्तर काश्मीरमधल्या बंदीपोरा जिल्ह्यातील हाजीन या गावामधील आहे. शनिवारी पोलिसांनी श्री महाराजा हरी सिंह रुग्णालयातून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
हेही वाचा - पाकिस्तान : ननकाना साहेब गुरुद्वारावर जमावाकडून दगडफेक
याआधी काश्मीर पोलिसांनी हिज्बुल मुजाहदीन दहशतवादी संघटनेशी संबधीत २ दहशतवाद्यांना अटक केली आहे. राज्यातील गांदेरबल जिल्ह्यातून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवणे, दहशतवाद्यांना मार्गदर्शन करणे तसेच दहशतवाद्यांचे जाळे मजबूत करण्याचे काम या दोघांना देण्यात आले होते. दोघांकडून शस्त्रास्त्रे आणि दोरुगोळाही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.