चेन्नई - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ही छायाचित्रे सध्या चंद्रभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरमधील अत्याधुनिक कॅमेऱ्याने (ओएचआरसी - ऑर्बिटर हाय रिझॉल्युशन कॅमेरा) घेतली आहे. इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ती पोस्ट केली आहेत.
-
#ISRO
— ISRO (@isro) October 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Have a look at the images taken by #Chandrayaan2's Orbiter High Resolution Camera (OHRC).
For more images please visit https://t.co/YBjRO1kTcL pic.twitter.com/K4INnWKbaM
">#ISRO
— ISRO (@isro) October 4, 2019
Have a look at the images taken by #Chandrayaan2's Orbiter High Resolution Camera (OHRC).
For more images please visit https://t.co/YBjRO1kTcL pic.twitter.com/K4INnWKbaM#ISRO
— ISRO (@isro) October 4, 2019
Have a look at the images taken by #Chandrayaan2's Orbiter High Resolution Camera (OHRC).
For more images please visit https://t.co/YBjRO1kTcL pic.twitter.com/K4INnWKbaM
इस्रोच्या माहितीनुसार, ऑर्बिटरने 100 किलोमीटर उंचीवरून ही छायाचित्रे घेतली आहेत. ही 'बोगस्लाव्स्की ई क्रेटर'ची असून याची साधारण १४ किलोमीटर व्यास आणि ३ किलोमीटर खोली आहे. याच्या आजूबाजूचा भाग चंद्रावरील दक्षिण ध्रुवीय प्रदेशात येतो.
चंद्राच्या पृष्ठभागाच्या या छायाचित्रात पाण्याच्या प्रवाहामुळे झीज होऊन तयार झालेल्या दगडासारखा वाटोळा गुळगुळीत दिसणारा खडक आणि एक छोटा क्रेटरही (खड्डा) दिसत आहे.
ऑर्बिटरमधील कॅमेऱ्याचे अंतराळातील रिझॉल्युशन २५ सेंटीमीटर आहे. १०० किलोमीटर उंचीवरून ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत. चंद्राची ठराविक प्रदेशांच्या भूसंरचनेचा अभ्यास करण्यासाठी हे आवश्यक आहे.