बंगळुरू - तांत्रिक बिघाडामुळे चांद्रयान-२ चे उड्डाण रद्द करण्यात आले होते. आता सोमवारी २२ जुलैला 'चांद्रयान-२' अवकाशात झेपावणार असल्याची माहिती इस्रोने दिली. २२ जुलैला भारतीय प्रमाण वेळेनुसार, दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे उड्डाण होणार आहे.
-
Chandrayaan-2 launch, which was called off due to a technical snag on July 15, 2019, is now rescheduled at 2:43 pm IST on Monday, July 22, 2019. #Chandrayaan2 #GSLVMkIII #ISRO
— ISRO (@isro) July 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Chandrayaan-2 launch, which was called off due to a technical snag on July 15, 2019, is now rescheduled at 2:43 pm IST on Monday, July 22, 2019. #Chandrayaan2 #GSLVMkIII #ISRO
— ISRO (@isro) July 18, 2019Chandrayaan-2 launch, which was called off due to a technical snag on July 15, 2019, is now rescheduled at 2:43 pm IST on Monday, July 22, 2019. #Chandrayaan2 #GSLVMkIII #ISRO
— ISRO (@isro) July 18, 2019
याआधी १५ जुलैला सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होते. मात्र, तांत्रिक कारणाने ते केवळ ५६ मिनिटे आधी ते रद्द करण्यात आले. उड्डाणाआधी क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या जॉईंटमधून गळती झाल्याचे निदर्शनास आले होते. GSLV MK 3 प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. यानंतर तातडीने उड्डाण रद्द करण्यात आले. आता २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ च्या प्रक्षेपण होणार आहे. यासाठी खोलवर परीक्षण सुरू आहे.
चांद्रयान-२ हा ९८७ कोटींचा प्रकल्प असून अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत चौथा देश असेल. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विंडो' न मिळाल्याने प्रक्षेपण कार्याक्रमावर परिणाम झाला आहे. विंडो चुकल्यामुळे अवकाश यानाला निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी जादा इंधनाची गरज पडेल. जेव्हा पृथ्वी आणि चंद्रदरम्यानचे अंतर कमीत कमी असते, ती वेळ या प्रक्षेपणासाठी योग्य आहे. यामुळे पृथ्वी आणि तिच्या भोवताली फिरणारे उपग्रह आणि अंतरिक्ष कचऱ्याशी यानाची टक्कर होण्याची शक्यता कमी असते.