ETV Bharat / bharat

१०७ व्या 'इंडियन सायन्स काँग्रेस'चे अधिवेशन बंगळुरुत सुरु; देश-विदेशातील वैज्ञानिकांची मांदियाळी - सायन्स काँग्रेस बातमी

जगभरातील महत्त्वाचे वैज्ञानिक, बुद्धिवादी, नेते या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. नोबेल पारितोषिक मिळवणारे दोन वैज्ञानिकही या अधिवेशनात सहभाग घेणार आहेत.

indian science congress
इंडियन सायन्स काँग्रेस
author img

By

Published : Jan 3, 2020, 8:47 AM IST

Updated : Jan 3, 2020, 10:51 AM IST

बंगळुरू - विज्ञान क्षेत्रामध्ये चर्चेचे महत्त्वाचे व्यासपीठ असणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसचे १०७ वे अधिवेशन आज (शुक्रवारी) बंगळुरू येथे सुरू झाले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाला जगभरातील वैज्ञानिक आणि महत्त्वाचे व्यक्ती हजेरी लावणार आहेत. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

जगभरातील महत्त्वाचे वैज्ञानिक, बुद्धिवादी, नेते या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. नोबेल पारितोषिक मिळवणारे दोन वैज्ञानिकही या अधिवेशनात सहभाग घेणार आहेत. स्टीफन हेल, मॅक्स प्लँक इन्सटिट्यूट, जर्मनी आणि अदा इ योनाथ, इजरायलमधील स्ट्रॅक्चरल बायालॉजीमधील तज्ज्ञ हे दोघे नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.

इंडोनेशियामधील नानयांग टेक्नोलॉजिकल विद्यापीठाचे अध्यक्ष सुभ्रा सुरेश, मटेरियल सायन्टिस्ट आणि प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट सी. एन मंजुनाथ या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. १५ हजार विविध क्षेत्रातील व्यक्ती या अधिवेशनात सहभाग घेणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. काल (गुरुवारी) त्यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि राज्यपाल वजूभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली. तसेच काल मोदींनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओच्या पाच प्रयोगशाळांचे उद्धाटन केले. तुमकूर येथील श्री सिद्धगंगा मठाला मोदींनी भेट दिली. तसेच त्यांनी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पुरस्कारांचे वितरण केले.

Intro:Body:

१०७ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन आज बंगळुरात; जगभरातील वैज्ञानिकांची हजेरी   

बंगळुरु- विज्ञान क्षेत्रामध्ये चर्चेचे महत्त्वाचे व्यासपीठ असणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसचे १०७ वे अधिवेशन आज(शुक्रवारी) बंगळुरु येथे होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाला जगभरातील वैज्ञानिक आणि महत्त्वाचे व्यक्ती हजेरी लावणार आहेत. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

जगभरातील महत्त्वाचे वैज्ञानिक, बुद्धिवादी, नेते या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. नोबेल पारितोषिक मिळवणारे दोन वैज्ञानिकही या अधिवेशनात सहभाग घेणार आहेत. स्टीफन हेल, मॅक्स प्लँक इन्सटिट्यूट, जर्मनी आणि अदा इ योनाथ, इजरायलमधील स्ट्रॅक्चरल बायालॉजीमधील तज्ज्ञ हे दोघे नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.

इंडोनेशियामधील नानयांग टेक्नोलॉजिकल विद्यापीठाचे अध्यक्ष सुभ्रा सुरेश, मटेरियल सायन्टिस्ट आणि प्रसिद्ध कार्डिओलॉजिल्ट सी. एन मंजुनाथ या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. १५ हजार विविध क्षेत्रातील व्यक्ती या अधिवेशनात सहभाग घेणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. काल(गुरुवारी) त्यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि राज्यापाल वजूभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली. तसेच काल मोदींनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डिआरडीओच्या पाच प्रयोगशाळांचे उद्धाटन केले. तुमकूर येथील श्री सिद्धगंगा मठाला मोदींनी भेट दिली. तसेच त्यांनी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पुरस्कारांचे वितरण केले.

Conclusion:
Last Updated : Jan 3, 2020, 10:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.