नवी दिल्ली - चीनशी बिघडत चाललेल्या संबंधांच्या दरम्यान नवी दिल्लीत 27 ऑक्टोबरला तिसऱ्या इंडो-यूएस 'टू-प्लस-टू' मंत्री स्तरावरील चर्चेचे आयोजन केले आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी काही आठवड्यांपूर्वी अमेरिका-भारत 'टू-प्लस-टू' चर्चा होणार आहे. याशिवाय, लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) भारत-चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे, अशा वेळी ही चर्चा होत झाली आहे. या शीत युद्धासारख्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि भारत यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
हेही वाचा - भारतीय भूप्रदेश चीनच्या हद्दीत दाखविल्यावरून सरकारचा ट्विटरला इशारा
'अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क टी. एस्पार चर्चेसाठी 26 आणि 27 ऑक्टोबरला भारत दौर्यावर येतील. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह त्यांच्याशी चर्चा करतील,' असे परराष्ट्र खात्याने सांगितले आहे.
भारताकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे आपापल्या मंत्रालयांच्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करतील.
पहिली 'टू-प्लस-टू' चर्चा सप्टेंबर 2018मध्ये दिल्लीत झाली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या यंत्रणेस मान्यता दिली. या चर्चेची दुसरी फेरी वॉशिंग्टनमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती. या मंत्री-स्तरीय संवादाची नवीन चौकट दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारीसाठी दूरदृष्टी ठेवून तयार केली गेली.
हेही वाचा - पाकने हाफिज सईद आणि सलाहुद्दीनला सांगितले, काश्मीर खोऱ्यात दहशतवादी पाठवा?