ETV Bharat / bharat

भारतीय अधिकाऱ्यांच्या अटकेनंतर भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तांना बोलवून विचारला जाब - इस्लामाबादेतील भारतीय दुतावासातील कार्यालय

पाकिस्ताकडून इस्लामाबादमध्ये दोन भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर भारताने आज पाकिस्तानी उच्चायुक्तांना बोलवून जाब विचारला. दरम्यान इस्लामाबाद दुतावासाने हे आरोप फेटाळून लावले असून ही जशास तशा पद्धतीची कारवाई असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

delhi
भारतीय अधिकारी
author img

By

Published : Jun 15, 2020, 8:47 PM IST

नवी दिल्ली - इस्लामाबादमध्ये दोन भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्ताकडून अटक करण्यात आली. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी आज पाकिस्तानी उच्चायुक्तांना बोलावून जाब विचारला. तत्पूर्वी सोमवारी सकाळी इस्लामाबादेतील भारतीय दुतावासातील कार्यालय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन अधिकाऱ्यांनी साडेआठ वाजता सोडले. भारतीय दुतावास प्रतिनियुक्तीवर असलेल्या या दोन अधिकाऱ्यांचा दोन तास कुठे आहेत, याचा तपास लागला नव्हता.

भारतीय उच्चायुक्तालयाने हे प्रकरण पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे नेले. दोघांनाही पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या लोकांनी ताब्यात घेतल्याची शंका व्यक्त केली जात होती. नंतर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी स्थानिक पोलीस सूत्रांचा हवाला देऊन वृत्त दिले. दोन भारतीय अधिकारी कथित हिट अँड रन प्रकरणात गुंतले असून त्यांना थांबवले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील पाकिस्तानचे हंगामी उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दुपारी बोलवून जाब विचारला. तसेच त्यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण प्रभारी संयुक्त सचिवांनी भारतीय अधिकाऱ्यांच्या अटकेबाबत बजावण्यात आले आहे. त्यानुसार भारतीय अधिकाऱ्यांची चौकशी किंवा छळ होता कामा नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही पाकिस्तानवर असेल, असेही त्यात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हिट अँड रन प्रकरणाचे जे कारण अटकेसाठी दिले आहे, ते अधिकृतपणे कळवले नसल्याचा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला आहे. पाकिस्तानला भारतीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कारसह त्वरित उच्चायुक्ताच्या ताब्यात देण्याचे सांगण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्यांने सांगितले. दोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या चालकाला हेरगिरीसाठी तसेच भारतीय सुरक्षेची कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारताने त्यांची हकालपट्टी केली होती. या घटनेच्या दोन दिवसांनंतर ही घटना घडली आहे.

इस्लामाबाद दुतावासाने हे आरोप फेटाळून लावले असून ही जशास तशा पद्धतीची कारवाई असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या गुप्तचर संस्थांवर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांवर छळ केल्याचे तसेच दोन्ही देशांच्या हंगामी उच्चायुक्तांच्या राजनैतिक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून धमकावल्याचे आरोप केले आहेत. तसेच सूत्रांनी आपल्या दाव्यांसाठी व्हिडिओही जारी करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.