ETV Bharat / bharat

'भारताने चीनकडून आयात कमी केली पाहिजे' - चीनी मालावर बहिष्कार

पूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट पसरली असून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. भारताने इतर देशांकडून विशेषत: चीनकडून आयात कमी केली पाहिजे, असे मत भाजप नेते राम माधव यांनी गुरुवारी व्यक्त केले.

राम माधव
राम माधव
author img

By

Published : Jun 18, 2020, 3:54 PM IST

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. त्यावर संपूर्ण देशात चीन विरोधात संतापाची लाट पसरली असून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरू येत आहे. भारताने इतर देशांकडून विशेषत: चीनकडून आयात कमी केली पाहिजे, असे प्रतिपादन भाजप नेते राम माधव यांनी गुरुवारी केले.

भारतामध्ये रसायने, मोबाईल फोनचे भाग आणि बटणे तयार करण्याची क्षमता आहे. आपन चीनकडून रसायने, मोबाईल फोनचे भाग आणि बटणे आयात करतो. ते आयात करणे इतके आवश्यक आहे का? ते भारतात तयार केले जाऊ शकतात. आपण इतर देशांकडून विशेषत: चीनकडून आयात कमी केली पाहिजे, असे राम माधव म्हणाले.

जर लोकांना चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालायचा असेल तर त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. आपले पहिले प्राधान्य अत्यंत दक्षता आणि सामर्थ्याने देशाच्या सीमेचे रक्षण करणे आणि सीमेवर यापुढे कोणताही हिंसाचार आणि जीवितहानी होणार नाही याची खात्री करणे, असेही ते म्हणाले.

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास चीनच्या आर्थिक बाजु कमजोर करु शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. कंफेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स (CAIT) यामध्ये अग्रेसर आहे. कॅटतर्फे देशभरात मोठे अभियान चालवले जात आहे. कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) यांनी बॉलिवूडसह क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींनी चीनच्या प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.