ETV Bharat / bharat

देशातील कोरोना रुग्ण संख्येने 7 लाखांचा टप्पा ओलांडला; गेल्या 24 तासात 22 हजार रुग्णांची भर - covid 19 cases in india

भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या 24 तासात तब्बल 22 हजार 252 ने वाढली आहे. एकूण रुग्ण संख्येने 7 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर गेल्या 24 तासात 467 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

india covid 19 cases
देशातील कोरोना रुग्ण संख्येने 7 लाखांचा टप्पा ओलांडला; गेल्या 24 तासात 22 हजार रुग्णांची भर
author img

By

Published : Jul 7, 2020, 10:40 AM IST

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या 24 तासात तब्बल 22 हजार 252 ने वाढली आहे. एकूण रुग्ण संख्येने 7 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर गेल्या 24 तासात 467 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण रुग्ण संख्या 7 लाख 19 हजार 665 झाली असून, सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाख 59 हजार 557 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही सक्रिय रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे. दुसरीकडे 20 हजार 160 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर -

वर्ल्डोमीटरनुसार भारत आता जागतिक स्तरावर कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्डोमीटरनुसार अमेरिका, ब्राझील भारताच्या पुढे आहेत तर रशिया चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत 30 लाख 40 हजार 833 कोरोना रुग्ण संख्या आहे. ब्राझीलमध्ये 16 लाख 26 हजार 71 आणि रशियात 6 लाख 87 हजार 862 रुग्ण संख्या असल्याची आकडेवारी वर्ल्डोमीटरने दर्शवली आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 60.77 वर पोहोचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.