ETV Bharat / bharat

NewsToday : या घडामोडींवर असणार आज खास नजर

दिवसभरातील खालील काही महत्वाच्या घडामोडींवर असणार आज खास नजर

या घडामोडींवर असणार आज खास नजर
या घडामोडींवर असणार आज खास नजर
author img

By

Published : Feb 2, 2021, 6:21 AM IST

  • संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते तेजस विमान निर्मितीचे उद्घाटन
    RAJNATH
    राजनाथ सिंग तेजस निर्मितेचे उद्घाटन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे हस्ते आज हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या तेजस या विमानांच्या उत्पादनाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. याबाबत एचएएलच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. तसेच केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडून हिंदूस्थान एअरोनॉटिक्सच्या ८३ एसके १ ए या विमान खरदेचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल कर्नाटक सरकारकडून राजनाथ सिंह यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

  • कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनावर पंजाबमध्ये आज सर्वपक्षीय बैठक
    पंजाब
    पंजाबमध्ये सर्वपक्षीय बैठक- मुख्यमंत्री

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंजाब भवनमध्ये ही बैठक पार पडणार आहे. गेल्या ६९ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आतापर्यंत केंद्र आणि शेतकऱ्यांच्या चर्चेच्या एकूण १२ फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र , शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

  • सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक आज होणार प्रसिद्ध
    CBSE
    सीबीएसईचे वेळापत्रक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) इयत्ता दहावी आणि बारावींच्या परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर होणार. या संदर्भातील माहिती सर्व प्रथम शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर सीबीएसई बोर्ड आपल्या अधिकृत वेबसाइट (cbse.gov.in) हे वेळापत्रक अपलोड करेल. यासह सीबीएसईच्या ट्विटर हँडलवर (CBSE Twitter) देखील इयत्ता 10 आणि 12च्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक पाहता येणार आहे.

  • महाराष्ट्र तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेकडून आज एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन..
    BULDANA
    बुलडाणा सामूहिक रजा

बुलडाणा - यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अद्याप कारवाई झाली नाही. त्यानिषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांकडून आज मंगळवारी (2 फेब्रुवारी) सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. या रजा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष आर एन देवकर व जिल्हा उपाध्यक्ष ना. तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे. या आंदोलनात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार संवर्गातील अधिकारी सहभागी होणार असून महसूल विभागाचे कामकाज ठप्प होणार आहे.

  • नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज ७/१२ दुरुस्तीसाठी विशेष मोहीम
    नाशिक तहसील
    सात बारा उतारा दुरुस्ती मोहीम

सातबारा दुरुस्तीसाठी आज सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत नाशिक तहसील कार्यालयात महाराजस्व अभियांनांतर्गत विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

  • आज जागतिक आर्द्रभूमी दिवस
    WETLAND
    आर्द्रभूमी दिवस

आर्द्रभूमी दिवस प्रतिवर्षी २ फेब्रुवारीला साजरा केला जातो. आर्द्रभूमी (wetland) अशा प्रकारची जमीन प्रत्येकवर्षी एखाद्या मोसमामध्ये पाण्याने व्यापलेली असते. अशा भूभागावर जलपर्णी वनस्पतीचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते.

  • आज अंधेरी-सांताक्रूझमधील पाणीपुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी खंडीत
    WATER
    आज पाणी पुरवठा होणार खंडीत

अंधेरी पूर्व येथे दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे काम तसेच चकाला केबिन येथील झडप बदलण्यात येणार आहे. या कामामुळे दिनांक २ व ३ फेब्रुवारी दरम्यान अंधेरी व सांताक्रूझ परिसरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा तर काही भागात पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. पालिकेच्या जल विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

  • POCO चा M3 किफायतशीर स्मार्टफोन आज लाँच होणार
    POCO चा M3 किफायतशीर स्मार्टफोन आज लाँच होणार

POCO कंपनीने यावर्षी त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी त्यांचा बहुप्रतीक्षित POCO M3 हा स्मार्टफोन 2 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता लाँच करणार आहे. नुकताच कंपनीने या स्मार्टफोनचा एक टीझर लाँच केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.