ETV Bharat / bharat

आशियातील सर्वात मोठे असणारे भारतातील 'हे' मोटर मार्केट बंद; मजुरांवर उपासमारीची वेळ

चंदीगड प्रशासनाने मोटर मार्केटला उघडण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे, मार्केट बंद आहे. यामुळे शोरूम मालकांना करोडो रुपयांचा घटा सहन करावा लागत असून मोटार कामगारही उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत.

motor market manimajra shutdoown
मनीमाजरा मोटर मार्केट
author img

By

Published : May 8, 2020, 1:52 PM IST

चंदीगड- लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून काही उद्योगांना सुरू होण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही अटी, शर्थींवर सरकारने ही परवानगी दिली आहे. त्यानुसार काही ठिकाणी उद्याग सुरू झाले आहेत. मात्र, आशियातील सर्वात मोठे मोटार मार्केट समजले जाणारे मनीमाजरा येथील मोटर मार्केट हे बंद आहे. त्यामुळे, या मार्केटमध्ये काम करणारा मजूर वर्ग बेरोजगार झाला आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

चंदीगड प्रशासनाने मोटर मार्केटला उघडण्याची परवानगी दिली नाही, त्यामुळे मार्केट बंद आहे. यामुळे शोरूम मालकांना करोडो रुपयांचा घटा सहन करावा लागत असून मोटार कामगारही उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने काही मोटर कामगारांशी चर्चा केली. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून दुकाने बंद आहेत. पहिले १० ते १२ हजार रुपये महिन्याचे काम मिळत होते, मात्र आता लॉकडाऊनमुळे उधारीवर उदरनिर्वाह होत असल्याची प्रतिक्रिया कामगारांनी दिली आहे.

दुकाने बंद असून काम ठप्प आहे. मोटार मार्केटशी संबंधित १० ते १२ हजार कामगार बेरोजगार आहेत. आमच्यासारखे अनेक कामगार दुकानांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र, दुकान उघडण्याची परवानगी न मिळाल्याने काम बंद असल्याची खंत एका ट्रक दुरुस्ती कामगाराने व्यक्त केली आहे. त्यामुळे, आता प्रशासनाने आपली मदत कारावी अशी विनंती मनीमाजरा मोटर मार्केटमधील कामगारांकडून केली जात आहे.

हेही वाचा- कडक सॅल्युट ! लग्न पुढे ढकलून परिचारिकेचे कर्तव्याला प्राधान्य; कोरोनावर विजयानंतरच चढणार बोहल्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.