बंगळुरू - माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र अभिनेते निखील कुमारस्वामी यांचा आज विवाह होत आहे. कोरोनाच्या काळातही त्यांच्या विवाहाची पूर्ण तयारी झाली आहे.
देशव्यापी लॉकडाऊन असतानाही हा विवाह आज पार पडणार आहे. निखीलचे रेवती सोबत लग्न होणार आहे. कर्नाटकचे माजी मंत्री एन. कृष्णाअप्पा यांची ती मुलगी आहे.
बंगळुरू शहरापासून काही अंतर दूर असलेल्या निखीलच्या फार्महाऊसवर मोजक्याच आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न होत आहे. प्रशासनाकडून कोरोना आणि लॉकडाऊनबाबतचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.