गांधीनगर - गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यात साठ फूट लांब पूल कोसळून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. काल (रविवारी) हा पूल कोसळला होता. सासण आणि गीर गावांना जोडणारा हा पूल बांधून अवघी ४० वर्षे झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या दुर्घटनेनंतर रस्तावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन चारचाकी आणि तीन दुचाकी गाड्या या पुलाखाली अडकल्या होत्या. नंतर या गाड्यांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघातानंतर तातडीने पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली, अशी माहिती जुनागढचे जिल्हाधिकारी सौरभ पारधी यांनी दिली.
हेही वाचा : 'आरे'मधील आणखी झाडे तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले