भोपाळ : यापुढे राज्यात केवळ स्थानिक नागरिकांनाच सरकारी नोकरी मिळणार असल्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत घोषणा केली. यासाठी आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मध्य प्रदेशमधील साधनसंपत्ती ही केवळ राज्यातील नागरिकांसाठीच आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे काम आम्ही सुरू केले आहे, असे शिवराज सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा : गुजरातमध्ये सावकाराच्या कर्जाला कंटाळून शिक्षकाने श्रीलंकेत जाऊन विकली किडनी