नवी दिल्ली - उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्याजागी मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बिहारमध्ये फागु चौहान नवे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्येही राज्यपाल बदलण्यात आला आहे. जगदीप धनखर यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, त्रिपुरामध्ये रमेश बैस, नागालँडमध्ये आरएन रवि यांची नियुक्ती करण्यात आली आहे.