ETV Bharat / bharat

विकास दुबे एन्काऊंटर : काय घडले दिवसभरात..?

author img

By

Published : Jul 10, 2020, 8:16 AM IST

Updated : Jul 10, 2020, 6:54 PM IST

gangster-vikas-dubey-killed-in-encounter-kanpur
यूपी पोलिसांच्या चकमकीत कुख्यात गुंड विकास दुबे ठार

16:05 July 10

भाजपने उत्तर प्रदेशचा 'अपराध प्रदेश' केला आहे; प्रियांका गांधींची टीका..

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी प्रतिक्रिया देत, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. योगी सरकारने उत्तर प्रदेशला 'अपराध प्रदेश' केले आहे, असे त्या म्हणाल्या. सत्तेत असणाऱ्या लोकांकडून विकास दुबेसारख्या गुंडांना संरक्षण दिले जात आहे. या संपूर्ण कानपूर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अध्यक्ष असलेल्या एका समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

15:15 July 10

बाबा रामदेव यांनीही केले उत्तर प्रदेश पोलिसांचे समर्थन..

योगगुरू बाबा रामदेव यांनीही विकास दुबे प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. बाबा रामदेव यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते उत्तर प्रदेश पोलिसांचे समर्थन करताना दिसून येत आहेत.

14:53 July 10

मला उत्तर प्रदेश पोलिसांचा अभिमान वाटतो...

उत्तर प्रदेश पोलिसांनी जे काम केले आहे, त्याने माझ्या आत्म्याला शांती लाभली आहे. यासाठी मी प्रशासन आणि योगी सरकारचे आभार मानतो, असे मत जितेंद्र पाल सिंह या कॉन्स्टेबलच्या वडिलांनी व्यक्त केले. ३ जुलैला विकास दुबेने केलेल्या हल्ल्यात जितेंद्र पाल सिंह यांनाही वीरमरण प्राप्त झाले होते.

13:04 July 10

  • गुंड विकास दुबेचा भाऊ फरार आहे. त्याची पत्नी रिचा दुबे आणि मुलाला एसटीएफने ताब्यात घेतले आहे.

12:58 July 10

  • गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटरची बातमी कळताच त्याच्या कुटुंबातील अद्याप कोणीही रुग्णालयात आलेले नाही. दुबेची आई सरला दुबे लखनऊमध्ये आहेत. मात्र, अद्याप त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिला आहे. तर कृष्णा नगर परिसरातील लखनऊ निवासस्थानाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

12:58 July 10

  • गुंड विकास दुबेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया.

12:58 July 10

  • या घटनेने सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. - जितीन प्रसादा, माजी केंद्रीय मंत्री

11:44 July 10

  • प्रशांत कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था, उत्तर प्रदेश)

11:44 July 10

ए. के. जैन (माजी पोलीस महासंचालक)
  • विकास दुबे हा एक भयानक गुंड होता. त्याने पोलिसांकडून शस्त्रे घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी आपले काम केले आहे. दुबेला त्याच्या अंतिम ठिकाणी पोहोचवले आहे. ए. के. जैन (माजी पोलीस महासंचालक, उप्रपोलीस)

11:44 July 10

जखमी पोलीस.
  • एन्काऊंटर नंतर जखमी पोलिसांना कानपूरच्या लाला लजपत राय रुग्णालयात आणण्यात आले.

11:44 July 10

नरोत्तम मिश्रा (गृहमंत्री, मध्यप्रदेश)
  • घटनेनंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा नरोत्तम मिश्रा यांची प्रतिक्रिया.

11:37 July 10

एन्काऊंटर होण्याआधी माध्यमांना थांबवण्यात आले होते.
  • विकास दुबेचे एन्काउंटर होण्याआधी पोलिसांनी एसटीएफ टीमला फॉलो करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना थांबवले होते.

11:37 July 10

  • गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या मृतदेहाची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. सध्या त्याचा मृतदेह हॅलेट रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरस रिपोर्ट आल्यानंतरच शवविच्छेदन केले जाईल.

09:32 July 10

  • अपराधी का अंत हो गया, अपराध और उसको सरंक्षण देने वाले लोगों का क्या?

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • कुख्यात गुंड विकास दुबे याच्या एन्काऊंटरनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया.

08:21 July 10

  • दरअसल ये कार नहीं पलटी है, राज़ खुलने से सरकार पलटने से बचाई गयी है.

    — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यांनी या प्रकरणावर राज्य सरकारवर निशाणा साधला.

08:21 July 10

  • घटनेचे प्रत्यक्षदर्शी याबाबत प्रतिक्रिया देताना.

08:21 July 10

रुग्णालयातील दृश्ये.
  • रुग्णालयातील दृश्ये.

08:21 July 10

या प्रकरणावर पोलीस अधिकारी माहिती देताना.
  • रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

08:04 July 10

undefined
  • मृत विकास दुबे.

08:04 July 10

प्रतिनिधी
  • उत्तर प्रदेशमधील कानपूर चकमक प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड विकास दुबे हा पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला आहे.

07:59 July 10

गुंड विकास दुबेला कानपूर येथे घेऊन जात असलेल्या गाडीला अपघात झाला होता.

कानपूर - उत्तर प्रदेशमधील कानपूर चकमक प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड विकास दुबे हा पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. शवविच्छेदनाआधी त्याच्या मृतदेहाची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. थोड्याच वेळात विकास दुबेच्या मृतदेहाचा कोरोना अहवाल येणार आहे. 

तर, सकाळीच दुबे याला उज्जैन येथून कानपूर येथे आणले जात असताना एसटीएफच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात कुख्यात गुंड विकास दुबे जखमी झाला होता. मात्र, तरीही याचा फायदा घेत त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून त्याने पोलिसांवर गोळी चालवली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्युत्तरात एसटीएफ फोर्सकडूनही गोळीबार करण्यात आला. या एन्काऊन्टरमध्ये दुबे ठार झाला.

कानपूरमधील 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या या कुख्यात गुंड विकास दुबेला काल (गुरुवारी) महाकाल मंदिराजवळ अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला मध्यप्रदेश पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यानंतर आज सकाळी दुबे याला उज्जैन येथून कानपूर येथे आणले जात होते. यात स्पेशल टास्क फोर्सच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये तीन पोलीस जखमी झाले. आज (शुक्रवारी) कानपूर न्यायालयात त्याला सादर केले जाणार होते. यादरम्यान, मुसळधार पाऊसही पडत होता. 

काय आहे घटना?

कानपूर जिल्ह्यातील बिकारू गावात राहणारा विकास दुबे हा कुख्यात गुंड होता. त्याच्यावर 60 गुन्हे दाखल आहे. राज्यमंत्र्यांची हत्या केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. शुक्रवारी (3 जुलै) रात्री पोलिसांचे पथक दुबेला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. पोलीस येत असल्याची माहिती त्याला आधीच खबऱ्याने दिली होती. त्यामुळे तो त्याच्या साथीदारांसह पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता.  

घराच्या गेटसमोर त्याने जेसीबी आणून उभे केले होते. तसेच त्याचे साथीदार छतावर बंदुका घेऊन थांबले होते. पोलीस पथक गेटवर येताच गुंडांनी गोळीबार केला. यामध्ये आठ पोलिसांचा मृत्यू झाला होता. तर सात जण जखमी झाले. या घटनेनंतर विकास दुबे साथीदारांसह घटनास्थळावरून पळून गेला होता. दुबे याचे राजकारणी आणि पोलिसांशीही लागेबंधे होते.

Last Updated : Jul 10, 2020, 6:54 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.