जमशेदपूर - शहरातील टाटा स्टीलसह अन्य कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ४ जपानी नागरिकांना मंगळवारी बंगळुरुला पाठवण्यात आले. देशात कार्यरत असणाऱ्या सर्व जपानी नागरिकांना बुधवारी बंगळुरूवरून जपानला रवाना करण्यात येणार आहे.
शहरातील सर्व जपानी नागरिकांना क्वारंनटाईन करण्यात आले होते. त्यानंतर जपान सरकारने त्यांच्या नागरिकांना परत पाठवण्यासंबंधीचे पत्र भारत सरकारला दिले. त्यानंतर केंद्र सरकारने मंजुरी देऊन राज्य सरकारला पत्र पाठवले. त्यानुसार टाटा स्टील येथील जमशेदपूर प्लांटमध्ये कार्यरत असणाऱ्या ७ जपानी नागरिकांना ७ एप्रिलला जपानला पाठवले होते. आता आणखी ४ जपानी नागरिकांना बंगळुरूला पाठवण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले होते. त्यानुसार त्यांना बंगळुरूला पाठवण्यात आले. देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या जपानी नागरिकांना बुधवारी सायंकाळी जपानला रवाना करण्यात येणार आहे. जपानी दुतावासाच्या नेतृत्वात ही सर्व कार्यवाही पूर्ण होणार आहे.