जामनगर - पूर्व आयपीएस संजीव भट्ट यांना १९९० साली झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत दोषी ठरवत गुजरातमधील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने संजीव भट्ट यांचे सहकारी डी. एन व्यास यांनाही दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणातील अन्य दोषी पोलिसांना अजून शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.
काय आहे प्रकरण?
गुजरातमधील जामनगर येथे १९९० साली संजीव भट्ट अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. जोधपूर कसब्यांमध्ये झालेल्या जातीयवादी हिंसाचारानंतर त्यांनी १५० जणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये प्रभुदास वैशनानी याचाही समावेश होता. सुटकेनंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला होता.
वैशनानीच्या भावाने भट्ट आणि अन्य ६ पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्याने पोलिसांच्या मारहाणीत भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता.