ETV Bharat / bharat

अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेसाठी देवाला दोष देणारे भाजप पहिलेच सरकार - काँग्रेस

आधीच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेची गेल्या 40 वर्षांतील सर्वात मोठी 23.9 टक्क्यांची घसरगुंडी झाली आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सुरजेवाला
सुरजेवाला
author img

By

Published : Sep 3, 2020, 4:51 PM IST

Updated : Sep 3, 2020, 5:26 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. आधीच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेची गेल्या 40 वर्षांतील सर्वात मोठी 23.9 टक्क्यांची घसरगुंडी झाली. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 73 वर्षांत पहिल्यांदा अर्थव्यवस्था आणि सामान्य व्यक्तीचं कंबरड मोडलं आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन हे मास्टर स्ट्रोक नाही. तर डिजास्टर स्ट्रोक आहेत. तसेच अर्थव्यवस्थेच्या दुर्देशेला देवाला दोष देणारे भाजप पहिलेच सरकार आहे, अशी टीका आज काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

आज देशात लघु, सूक्ष्म आणि मध्यम व्यवस्याय बंद पडले असून रोजगारचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली असून जीडीपीने पाताळ गाठले आहे. गेल्या 6 वर्षांपासून 'अ‌ॅक्ट ऑफ फ्रॉड'ने अर्थव्यवस्थेला डबघाईला नेणारे मोदी सरकार आता याचे खापर 'अ‌ॅक्ट ऑफ गॉड' वर म्हणजेच देवावर फोडत आहे. जी लोक देवालाही धोका देत आहेत. ती लोक समान्य व्यक्ती आणि अर्थव्यवस्थेला कसे सोडतील, असे सुरजेवाला यांनी म्हटलं.

लोकांचा सरकारवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. लघु, सूक्ष्म आणि मध्यम व्यावसायिकांना विचारल्यास ते सांगतील की, बँका कर्ज देत नसून अर्थमंत्र्याच्याही वक्तव्यात कोणतं वजन नाही. मोदी सरकारचा 20 कोटी रुपयांचा जुलमाही बुडती अर्थव्यवस्था, आर्थिक डबघाई आणि जीडीपीचा दर घसरण्यापासून रोखण्यात अपयशी ठरलं, असेही ते म्हणाले.

गेल्या 73 वर्षांत पहिल्यांदा केंद्र सरकार दिवाळखोर झाले आहे. अंहकारात बुडालेले सरकार देशाची अर्थव्यवस्था, उद्योगांची प्रगती, शेतकऱ्यांची मेहनत, युवकांचा रोजगार या सर्व गोष्टींना सोडून फक्त आपला पक्ष सत्तेत कसा राहील याकडे, त्यांचे लक्ष आहे, असे सुरजेवाला यांनी जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे.

Last Updated : Sep 3, 2020, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.