ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेशच्या कानपुरजवळ पूर्वा एक्सप्रेसचे पाच डबे रुळावरुन घसरले! अनेकजण जखमी, बचावकार्य सुरु - purva express

अपघाताची माहिती मिळताच कानपुरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, रेल्वे पोलीस आणि जिल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळावरील दृश्ये
author img

By

Published : Apr 20, 2019, 5:12 AM IST

कानपुर - पूर्वा एक्स्प्रेसचे पाच एसी डब्बे कानपुर जवळच्या रुमा आणि चकेरी गावालगतच्या रुळांवरून घसरल्याची घटना घडली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच कानपूरचे एडीजी, रेल्वे पोलीस आणि जिल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रेल्वे पोलीस आणि सुरक्षा रक्षकांकडून रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना आज मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. दरम्यान, पूर्वा एक्स्प्रेस ही हावडावरून नवी दिल्लीकडे जात होती. सध्या बचावकार्य सुरू असून प्रवाशांसाठी दुसऱ्या रेल्वेची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.