बडवानी (भोपाल, मध्यप्रदेश) - मध्यप्रदेश पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या सुमारे 400 मजुरांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सुमारे सात हजार मजुरांचा जमाव महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर जमा झाला होता. हे मजूर रोजंदारीसाठी महाराष्ट्रात आले होते. ते आपापल्या घरी जाऊ इच्छित होते. पण, त्यांना सीमेवर थांबिण्यात आल्याने त्यांनी पोलीस व उपजिल्हाधिकारी यांच्यावर दगडफेक केल होती. या उपजिल्हाधिकाऱ्यांसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
जमा झालेल्या मजूर मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशातील होते. ते मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील बडवानी येथे ठिय्या मारुन होते. ते सतत सीमेतून मध्यप्रदेशात जाणाच्या प्रयत्न करत होते. पण, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या राज्याच्या सीमा बंद केल्याने तसेच मुंबई-आग्रा महामार्गही बंद केल्याने मध्यप्रदेश पोलिसांनी त्यांना अडविले होते. पण, काही संतप्त मजुरांनी ही दगडफेक केली होती.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांशी संपर्क सुरु असल्याचे बडवानीचे जिल्हाधिकारी अमित तोमर यांनी सांगितले.
हेही वाचा - तेलंगाणा भाजप अध्यक्षांनी सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा; पोलिसांनीही केले दुर्लक्ष