ETV Bharat / bharat

धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज : वडिलांकडून मुलाचा कोयत्याने सपासप वार करून खून - विशाखापट्टणम वडिलांकडून मुलाचा खून

संपत्तीवरून वाद उफाळल्यानंतर पुढे बघून आपल्या कामात असताना मागून वडिलांनी अचानक येवून मुलावर वार केले. त्यामुळे मुलगा काही कळण्याच्याआतच जाग्यावर निपचीत पडला.

विशाखापट्टणम
विशाखापट्टणम
author img

By

Published : Aug 14, 2020, 2:46 PM IST

विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) - वडिलांनीच आपल्या मुलाचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार विशाखापट्टणमच्या सत्यानगरमध्ये घडला आहे. जी. जलाराजू (वय ४१) असे मृताचे नाव असून ते नौदलामध्ये नोकरीस होते. या भयानक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

जलाराजू आणि त्यांचे वडील यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीवरून वाद सुरू होता. वीरराजू (वय ७२) असे मारेकरी वडिलांचे नाव असून तेही नौदलात नोकरीस होते. संपत्तीवरून पुन्हा वाद उफाळल्यानंतर पुढे बघून आपल्या कामात असताना मागून वडिलांनी अचानक येवून मुलावर वार केले. मुलगा तडफडत असताना ते पुन्हा-पुन्हा वार करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. या हल्ल्यामुळे ते काही कळण्याच्या आतच जाग्यावर निपचीत पडले. पेंदुरती पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - भारत-चीन तणाव : लडाखमध्ये दोन लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तैनात

हेही वाचा - देशात 56 हजार 383 जण कोरोनामुक्त; दिवसभरात 942 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.