गाझियाबाद - कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली गाझीपूरसह राजधानीच्या इतर सीमांवर शेतकरी आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण सरकार आणि शेतकरी यांच्यात सुरू असलेला वाद आणखीन सुरू आहे. आज सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेची 11 वी बैठक होणार आहे.
केंद्र सरकारने पुकारलेल्या 11 फेरीच्या बैठकीसाठी राकेश टिकैत बरेच उत्साही दिसत होते. यावेळी त्यांनी ट्रॅक्टर मोर्चासंदर्भात प्रतिक्रिया दिली. खेड्यांमधून शेतकरी रेशन वगैरे घेऊन दिल्लीत आले आहेत. शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च दिल्लीत प्रवेश करणार. या मार्चला कोण रोखणार ते पाहू, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारने दीड वर्षासाठी कृषी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव दिला होता. जे शेतकर्यांनी पूर्णपणे नाकारलं आहे. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांसमोर सरकार काय प्रस्ताव ठेवेल, हे पाहूया. शासनाकडून जे काही प्रस्ताव येईल, त्यावर शेतकरी आपापसात चर्चा करतील, असे त्यांनी सांगितले.
दहावी फेरी -
जोपर्यंत तीन कृषी कायदे रद्द होत नाहीत. एमएसपीची हमी दिली जात नाही, तोपर्यंत शेतकरी आंदोलन मागे हटणार नाही, हे सरकारला कळून चुकले आहे, असेही टिकैत म्हणाले. 20 जानेवरील चर्चेची दहावी फेरी पार पडली होती. दीड वर्षासाठी कायद्याची अंमलबजावणी रोखण्यासाठी केंद्र सरकार तयार झाले होते. आजच्या चर्चेतून काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.