ETV Bharat / bharat

Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर... - indo china war

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

etv-bharat-top-10-news-at-9-am
Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...
author img

By

Published : Jun 17, 2020, 8:58 AM IST

मुंबई - लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत... भारत-चीन सीमावाद चिघळल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकामागोमाग एक अशा दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. यामध्ये लडाखमधील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला... कोविड-१९ रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढवणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा लंडनच्या संशोधकांनी दावा केला आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...

  • नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयला सुत्रांनी ही माहिती दिल्याची माहिती दिली.

सविस्तर वाचा - भारत-चीन सैन्याच्या हाणामारीत चीनचे ४३ जवान ठार

  • नवी दिल्ली : भारत-चीनच्या सीमेवरील गलवान येथे सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आल्याची माहिती समोर येत आहे. ही संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आपले १० जवान बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

सविस्तर वाचा - भारत-चीन सैनिकांमधील झटापटीला नवे वळण; तब्बल २० जवानांना वीरमरण..

  • नवी दिल्ली - गलवान परिसरातील भारत चीन सीमेवर सैनिकांच्या हाणामारीत चीनी सैनिकांचीही जिवितहाणी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती समोर आली आहे. गलवान व्हॅली परिसरात सैनिकांच्या हाणामारीत चीनी सैनिकांचीही जीवितहाणी झाल्याचे मला समजले आहे, असे ट्विट संपादक हु शिजीन यांनी ट्विट केले आहे.

सविस्तर वाचा - गलवान व्हॅलीतील सैनिकांच्या हाणामारीत चीनचीही जीवितहानी...चिनी वृत्तपत्राच्या संपादकाची कबुली

  • नवी दिल्ली - लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत-चीन सीमावाद चिघळल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकामागोमाग एक अशा दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. यामध्ये लडाखमधील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आले आहे. त्यानंतर तणाव आणखीनच वाढला आहे.

सविस्तर वाचा - भारत- चीन सीमावाद चिघळल्याने संरक्षणमंत्र्यांच्या एकामागोमाग एक उच्चस्तरीय बैठका

  • नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान भागात भारत चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱयासह दोन जवानांना विरमरण आले. यावरून काँग्रेसने भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप हा सर्व प्रकार काहीही न करता शांतपणे पाहत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गप्प का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदिप सुरजेवाल यांनी केला आहे.

सविस्तर वाचा - भारत- चीन सीमा वाद: पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गप्प का? काँग्रेसचा सवाल

  • लंडन : कोविड-१९ रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढवणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा लंडनच्या संशोधकांनी दावा केला आहे. 'डेक्सामेथासॉन' हे स्टेरॉईड कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे हे स्टेरॉईड स्वस्त आणि जगभरात सगळीकडे सहजरीत्या उपलब्ध होईल असे आहे.

सविस्तर वाचा - कोरोनावर प्रभावी ठरणारे औषध अखेर मिळाले!

  • अकोला - भारत आणि चीन या दोन देशांमध्ये असलेली सध्याची परिस्थिती म्हणजे ही नुराकुस्तीसारखी आहे. या दोन्ही देशांच्या प्रमुखांना त्यांच्या जनतेला तोंड द्यायचे आहे. म्हणून ही परिस्थिती निर्माण करण्यात आली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सविस्तर वाचा - भारत-चीनमध्ये सध्या नुराकुस्ती सुरू आहे; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

  • मुंबई - निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, मच्छिमार उद्ध्वस्त झाले आहेत आणि आता पुन्हा या कोकणला उभे करायचे आहे. कोकणाच्या दौऱ्यात, कोकणाचे जे विदारक चित्र पाहिलं ते कुठेतरी आपल्याला बदलायचे आहे, कोकणवासियांना तत्कालिक मदत करायची आहे, तसेच शासनाने घोषित केलेली मदतही त्यांना मिळवून द्यायची आहे. त्यामुळे सर्वांच्या माध्यमातून कोकणाला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणू, असा ठाम विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा - कोकणाचे हरवलेले वैभव आणि आर्थिक सुबत्ता पुन्हा मिळवून देऊ - प्रविण दरेकर

  • मुंबई - राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असला तरी पावसाचे मुख्य क्षेत्र कोकण, गोवाच असणार आहे. 20 जूनपर्यंत कोकण, गोव्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचसोबत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथेही पाऊस पडण्याची शक्यता आहे. उपग्रह आणि रडारने पाठविलेल्या चित्रांनुसार राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथे ढगाळ वातावरण आहे. याबद्दल मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केले आहे.

सविस्तर वाचा - राज्यातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

  • लंडन - गर्भधारणेदरम्यान आईपासून नवजात बाळाला कोरोना होणे असामान्य गोष्ट असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार, मुलाचा जन्म, स्तनपान किंवा पालकांच्या संपर्कात आल्याने बाळांना संसर्ग होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. बीजेओजी या इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अॅण्ड गायनोकॉलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनात म्हटले आहे, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बहुतेक बाळांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत.

सविस्तर वाचा - गर्भधारणेदरम्यान आईपासून बाळाला कोरोनाचा संसर्ग? वाचा संशोधकांचे मत

देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.