नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या निवडणुकांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, २८ ऑक्टोबर, तीन नोव्हेंबर आणि सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकांचा निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. २४३ सदस्यसंख्या असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबत माहिती दिली.
-
Bihar to vote in 3 phases on 28th October, 3rd and 7th November; results on 10th November, announces Election Commission #BiharPolls pic.twitter.com/8KpZBkv0V4
— ANI (@ANI) September 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bihar to vote in 3 phases on 28th October, 3rd and 7th November; results on 10th November, announces Election Commission #BiharPolls pic.twitter.com/8KpZBkv0V4
— ANI (@ANI) September 25, 2020Bihar to vote in 3 phases on 28th October, 3rd and 7th November; results on 10th November, announces Election Commission #BiharPolls pic.twitter.com/8KpZBkv0V4
— ANI (@ANI) September 25, 2020
कोरोना परिस्थिती कमी होताना दिसून येत नाहीये. विधानसभेचा कार्यकाळही संपत चालला आहे. त्यामुळे आपल्याला विशेष खबरदारी बाळगत कोरोना काळातच ही निवडणूक पार पाडावी लागणार आहे. याबाबत सरकारने विशेष तयारी आणि मार्गदर्शिका ठरवली आहे, असेही अरोरा यांनी सांगितले.
तीन टप्प्यांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांमधील ७१ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्ह्यांमधील ९७ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. तिसऱ्या टप्प्यामध्ये १५ जिल्ह्यांमधील ७८ मतदारसंघांमध्ये मतदान होईल.
निवडणुकांसाठी अशी असणार तयारी..
मतदान केंद्रांसाठी हँड सॅनिटायझरचे सात लाख सेट, ४६ लाख मास्क, सहा लाख पीपीई किट्स, ६.७ लाख फेस-शील्ड्स आणि हातमोज्यांचे २३ लाख जोड यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच, मतदारांसाठी एकदाच वापरण्यात येणाऱ्या ७.२ कोटी हातमोज्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
विलगीकरण कक्षात असणाऱ्या मतदारांनाही मतदान करण्यात येणार आहे. मतदानाच्या शेवटच्या दिवशी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ते मतदान केंद्रावर मतदान करु शकतील. यासोबतच, ज्यांना आपल्या मतदान केंद्रावर जाता येणार नाही, त्यांना पोस्टल मतदान करण्याची मुभाही देण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी मतदानाची वेळ एका तासाने वाढवण्यात येणार आहे. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या भागामध्ये मात्र नेहमीप्रमाणे सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या नियमांमध्येही बदल करत, आदर्श आचारसंहिता (एमसीसी) लागू करण्यात येणार आहे. या आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी केली आहे.
समाजमाध्यमांचा गैरवापर केला जाऊ नये यासाठी संबंधित समाजमाध्यमांनी तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गैरवापराची प्रकरणे हाताळण्यासाठी समाजमाध्यमांना कठोर प्रोटोकॉल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.